योग दिवसा निमित्य योग शिक्षक मधुकरजी धोपाडे सरांचा सत्कार
#) करे योग रहे निरोग – मधुकरजी धोपाडे.
कन्हान : – शहर विकास मंच द्वारे योग दिवसा निमित्य योग शिक्षक मधुकरजी धोपाडे सरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून योग दिवस साजरा करण्यात आला.
चेतनात्मक ध्यान योग केंन्द्राचे योग शिक्षक मधुक रजी धोपाडे हे ८० वर्षा च्या वर असुन आज ही नागरि कांना योग शिकवत असल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिका-यांनी त्यांच्या घरी जाऊन योग शिक्षक मधुकरजी धोपाडे सरांना पुष्प गुच्छ देऊन सत्कार करून योग दिवस साजरा करण्यात आला .
करे योग रहे निरोग – मधुकरजी धोपाडे
यावेळी योग शिक्षक मधुकरजी धोपाडे सरांनी योग दिवसा निमित्य मार्गदर्शन केले कि, योग म्हणजे जोडणे आपण आपल्याला आपल्या स्वास्थासाठी जोडतो. योग करणे फार गरजेचे असुन स्वस्थ राहण्या साठी योग करणे फार गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकां नी सकाळी उठुन योग करायला पाहिजे. त्यामध्ये योग , प्राणायम आणि आस्ना हे सर्व त्याचे जोड असुन स्वस्थ राहण्यासाठी प्रत्येकांनी सकाळी उठुन योग करायला पाहिजे. असे कडकडीचे भावनिक आवाहन योग शिक्षक मधुकरजी धोपाडे सरांनी नागरिकांना केले आहे. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, अखिलेश मेश्राम, प्रविण माने सह मंच पदाधि कारी प्रामुख्याने उपस्थित होते.