दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थांचा सत्कार
कन्हान : – शहर विकास मंच द्वारे दहावी व बारावी मध्ये प्राविण्य प्राप्त उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचा भव्य सत्कार सोहळयाचे आयोजन (ता.22) बुधवार रोजी प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान ग्रीन जीम परिसरात करण्यात आला.
कन्हान शहर विकास मंच द्वारे भव्य सत्कार सोहळा.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बळीरामजी दखने हायस्कुल च्या मुख्याध्यापिका श्रीमती विशाखा ठमके यांच्या हस्ते व प्रमुख पाहुण प्राध्यापिका वर्षा सिंगाडे, नागपुर ग्रामिण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, मंच मार्गदर्शक भरत सावळे, प्रभाकर रूंघे, सुरेश भिवगडे , यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमे ला पुष्पहार माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्र माची सुरूवात करण्यात आली. यावेळी इयत्ता बारावी धर्मराज जुनियर काॅलेज कांद्री कन्हान येथील जानव्ही भोंडे हिने ९०:३०% गुण प्राप्त करीत तालुक्यात प्रथम व सानिका मंगर हिने ८८ % गुण प्राप्त करीत तालुक्या त दुसरा क्रमांक पटकाविला. भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय कन्हान येथील वाणिज्य शाखेतुन आकांशा चकोले हिने ७८:३३% गुण प्राप्त करीत काॅलेज मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला व कला शाखे तुन पलक मरसकोल्हे हिने ७६:८३% गुण प्राप्त करीत काॅलेज मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. इयत्ता दहावी मध्ये बीकेसीपी शाळेतुन सुहासीनी शुक्ला हिने ९५: ४०% गुण प्राप्त करीत तालुक्यात प्रथम क्र पटकावि ला असुन धर्मराज विद्यालयातुन आयुष सोनेकर याने ९०% गुण प्राप्त करीत विद्यालयातुन प्रथम क्रमांक पटकाविला. बळीरामजी दखने हायस्कुल शाळेतुन कु. अपेक्षा रंगारी हिने ९२:८०% गुण प्राप्त करीत शाळेत प्रथम क्रमांक पटकाविला. तर सरस्वती न्यु इंग्लिश हायस्कुल शाळेतुन मयुरेश रेखाते ह्याने ९२:३०% गुण प्राप्त करीत शाळेत प्रथम क्रमांक पटकाविला. पंडित जवाहरलाल नेहरू शाळेतुन कु. दिव्यानी काकडे हिने ८५:४०% गुण प्राप्त करीत शाळेतुन प्रथम क्रमांक पटकाविला. आदर्श हायस्कुल कन्हान शाळेतुन कु. काजल कामट हिने ७७:८०% गुण प्राप्त करीत शाळेत प्रथम क्रमांक पटकाविला. अशा सर्व विद्यार्थांना मान्य वरांचा व मंच पदाधिकार्यांचा हस्ते स्मृतीचिन्ह, नोटबु क, पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थांना मार्गदर्शन करून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. तदंतर मान्य वरांना, विद्यार्थांना व उपस्थित नागरिकांना अल्पोहार वितरण करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी वरिष्ठ पत्रकार कमलसिंह यादव, संजय तिव सकर , सेवकराम भोंडे, अनिल मंगर, विजय शुक्ला, हरीचंद्र चकोले, सोमनाथ मरसकोल्हे, संजय सोनेकर, मिलींद रंगारी, चंद्रमोहन कामट , जगदीश काकडे, रतन रेखाते सह पालक, नागरिक बहु संख्येने उपस्थि त होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन महेंद्र साबरे यांनी तर आभार महेश शेंडे यांनी व्यकत केले. कार्यक्रमा च्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंच संस्था पक अध्यक्ष ऋषभ बावनकर, उपाध्यक्ष महेंद्र साबरे, सचिव सुरज वरखडे, सहसचिव प्रकाश कुर्वे, कोषाध्य क्ष महेश शेंडे, हरीओम नारायण, अनुराग महल्ले, कृणाल राजपुत, प्रविण हुड, शुभम नागमोते, हर्षल नेवारे, स्वप्निल वरखडे सह आदी मंच पदाधिका-यानी उपस्थित राहुन सहकार्य केले.