फिल्मी स्टाईल राडा ; चाकू हल्ल्याचा थरार  जुन्या वादातून दोन गटात चाकू हल्ल्यात पाच आरोपी अटक

फिल्मी स्टाईल राडा ; चाकू हल्ल्याचा थरार

जुन्या वादातून दोन गटात चाकू हल्ल्यात पाच आरोपी अटक

कन्हान,ता.२३ जून

        रायनगर, कन्हान येथील विकास हायस्कूलच्या मैदानात बुधवार (दि.२१) जुन ला रात्री साळे आठ वाजता च्या दरम्यान जुन्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. यात चाकु हल्ल्यात दोन ते तीन युवक जख्मी झाल्याने पोलीसांनी पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .

   पोलिसांच्या माहितीनुसार, राम खंडारे (वय २८) व‌ कृष्णा खंडारे (वय २६) रा.रायनगर, कन्हान दोन्ही भावांनी बुधवार रोजी साळे आठ वाजता दरम्यान आईला बाजारा मधून घरी चिकन आणून देऊन विकास हायस्कूलच्या पटांगणात फिरायला गेले. यावेळी रामला सिगारेट ओढायची होती म्हणून त्याने खिशातून सिगारेट काढून पेटवली. या दरम्यान सोनू गुप्ता (वय २०) हरीहर नगर, कांन्द्री, रोहन चव्हाण इंदिरा नगर, शुभम सिडाम रायनगर, कन्हान हे कृष्णा जवळ आले. काही न बोलता रोहन चव्हाण, शुभम सिडाम यांनी कृष्णा खंडारे ला हातबुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी वेळी सोनू गुप्ताने खिशातून चाकू काढून कृष्णाच्या डाव्या पायावर व हातावर वार केले. तिसरा वार पोटावर मारत असतांनाच राम खंडारे यांने चाकू पकडला ज्यामध्ये रामच्या हाताला गंभीर दुखापत झाली . दरम्यान जीव वाचविण्यासाठी दोन्ही भावांनी पळ काढत पोलीस स्टेशन गाठून सोनू गुप्ता, रोहन चव्हाण, शुभम सिडाम यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली.

   सोनू गुप्ताच्या तक्रारीनुसार, भाऊ लालू गुप्ता यांच्या कृष्णा खंडारे सोबत २०२१ मध्ये बर्फ गोलाचा ठेल्यावरून जोरदार वाद विवाद झाला होता. बुधवार च्या रात्री सोनू गुप्ता आणि त्याचे मित्र बाबू कुरेशी, रोहन चौहान यांचा सोबत विकास हायस्कूलच्या पटांगणात बसून सिगारेट ओढत होते. दरम्यान कुणाल खंडारे व त्याचा मोठा भाऊ राम उर्फ ​​गजनी खंडारे हे त्याच्याकडे गेले. कुणाल ने सोनू गुप्ता जवळील सिगारेट हिसकावुन पिण्यास सुरुवात केली. सोनु ने कुणाल ला म्हटले कि माझी सिगारेट परत दे , मी सिगारेट पैश्याने घेतली आहे .यावेळी राम खंडारे यांने सोनू ला शिवीगाळ करून त्याचा गळा धरला तर कृष्णाने शिवीगाळ करत जवळ असलेल्या चाकूने सोनू गुप्ता च्या उजव्या हातावर व उजव्या गुडघ्या वर वार करून जखमी केल्याचे सोनू गुप्ताने आरोपीं विरूद्ध तक्रार दाखल केली. कन्हान पोलिसांनी जखमींवर वैद्यकीय उपचार केल्यानंतर दोन्ही गटांच्या तक्रारी वरून पाच आरोपीं विरुद्ध कलम ३२४ , ३४ भांदवि अन्वये गुन्हे दाखल करून पाच आरोपींना अटक करून सुचना पत्रावरून सोडून दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रविण चव्हाण तपास करीत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

विद्युत तारेच्या स्पर्शाने महावितरण कंत्राटी कामगाराचा मृत्यु

Fri Jun 23 , 2023
विद्युत तारेच्या स्पर्शाने महावितरण कंत्राटी कामगाराचा मृत्यु कन्हान,ता.२३ जून     कन्हान शहरातील खंडाळा (घटाटे ) गावाच्या हद्दीतील बसस्थानका जवळ विद्युत खांबावर वीज दुरूस्ती चे काम करत असताना महावितरण कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगार श्रावण भारसाखरे यांचा मृत्यु झाल्याने संपुर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.       मिळालेल्या माहिती नुसार, […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta