जुनीकामठी येथे विद्यार्थी व महिला,पुरूष कामगारांना छत्री वाटप

जुनीकामठी येथे विद्यार्थी व महिला,पुरूष कामगारांना छत्री वाटप

कन्हान,ता.23 जुलै

    अग्रेसर महिला मंडळ नागपुर (सुरभी) व जुनीकामठीचे माजी उपसरपंच, ग्रा.प.सदस्य भुषण इंगोले यांचा संयुक्त विद्यमाने ग्राम पंचायत परिसरात आणि श्री क्षेत्र कामठेश्वर मंदीर येथे पावसाळ्यात गरीब गरजु विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी व शेतकरी, कामगार, गाई- म्हशी चारण्यारे आदी गरजुना १५० छत्री वाटप करण्यात आले.
जुनीकामठीच्या गरजु विद्यार्थी, महिला, पुरूषाना छत्री वाटप कार्यक्रम जि.प.माजी उपाध्यक्ष मा.शरद डोणेकर यांच्या अध्यक्षेत आणि सामाजिक कार्यकर्ते कमलाजी गोयल (बुआजी), माजी उपसरपंच भुषण इंगोले, कन्हानचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश ढोले, राम जुनघरे, संजय खंंते, मंदा टेकाम (करवती), रूपेश टेकाम, शिक्षक सुनील पाटील, लिना खाडे मॅडम, ममता रहाटे मॅडम, विजया धाडसे मॅडम, सौरभ डोणेकर, आकाश पंडितकर आदींच्या प्रमुख उपस्थित पावसा ळ्यात शिक्षणास आणि कामावर जाण्याकरिता गरजु ३७ विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी व शेतकरी, कामगार, गाई-म्हशी चारण्यास आदी कामावर जाण्याकरिता गरजु ११३ महिला, पुरूष असे एकुण १५० विद्यार्थी, नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले. कार्यक्रमा चे संचालन महेंद्र चहांदे यांनी तर आभार शुभांगी इंगोले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता अग्रेसर महिला मंडळ नागपुर (सुरभी) च्या रीमा गर्ग, यमुना अग्रवाल, सुनीता अग्रवाल, सीमा अग्रवाल, पुष्पा पोद्दार, निमाजी अग्रवाल व जुनीकामठी चे माजी उपसरपंच आणि ग्रा.प.सदस्य भुषण इंगोले आदीने अथक परिश्रम करून मौलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पोलीस चौकी सुरू करून वाहतुक पोलीस नेमण्यात यावा

Sat Jul 23 , 2022
पोलीस चौकी सुरू करून वाहतुक पोलीस नेमण्यात यावा कन्हान,ता 23 जुलै       तारसा रोड चौक येथे असलेलेली पोलीस चौकी चारपदरी सिमेंट महामार्ग निर्माण कामात तोडण्यात आली. तेव्हा पासुन नव्याने  बनविण्यात न आल्याने चौकातील वाहतुक पोलीस सुध्दा हलविण्यात आले. असल्याने या वर्दळीच्या चौकात वाहन चालक आपली वाहने निष्काळजीने चालवित असल्याने […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta