विद्यार्थी व महिला,पुरूष कामगारांना छत्री वाटप
कन्हान, ता.23 जुलै
अग्रेसर महिला मंडळ नागपुर (सुरभी) व जुनीकामठीचे माजी उपसरपंच ग्रा.प. सदस्य भुषण इंगोले यांचा संयुक्त विद्यमाने ग्राम पंचायत परिसरात आणि श्री क्षेत्र कामठेश्वर मंदीर येथे पावसाळ्यात गरीब गरजु विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी व शेतकरी, कामगार, गाई म्हशी चारण्यारे आदी गरजुना १५० छत्री वाटप करण्यात आले.
जुनी कामठीच्या गरजु विद्यार्थी, महिला, पुरूषाना छत्री वाटप कार्यक्रम जि.प. माजी उपाध्यक्ष मा.शरद डोणेकर यांच्या अध्यक्षेत आणि सामाजिक कार्यकर्ते कमलाजी गोयल (बुआजी), माजी उपसरपंच भुषण इंगोले, कन्हानचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश ढोले, राम जुनघरे, संजय खंंते, मंदा टेकाम (करवती), रूपेश टेकाम, शिक्षक सुनील पाटील, लिना खाडे मॅडम, ममता रहाटे मॅडम, विजया धाडसे मॅडम, सौरभ डोणेकर, आकाश पंडितकर आदींच्या प्रमुख उपस्थित पावसाळ्यात शिक्षणास आणि कामावर जाण्याकरिता गरजु ३७ विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी व शेतकरी, कामगार, गाई म्हशी चारण्यास आदी कामावर जाण्याकरिता गरजु ११३ महिला, पुरूष असे एकुण १५० विद्यार्थी, नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले. कार्यक्रमा चे संचालन महेंद्र चहांदे यांनी तर आभार शुभांगी इंगोले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता अग्रेसर महिला मंडळ नागपुर (सुरभी) च्या रीमा गर्ग, यमुना अग्रवाल, सुनीता अग्रवाल, सीमा अग्रवाल, पुष्पा पोद्दार, निमाजी अग्रवाल व जुनीकाम ठी चे माजी उपसरपंच आणि ग्रा प सदस्य भुषण इंगोले आदीने अथक परिश्रम करून मौलाचे सहकार्य केले.
Post Views: 942
Sat Jul 23 , 2022
वराडा बस स्टॉप महामार्गावर अंडर ब्रिजची मागणी – सरपंचा विद्या चिखले कन्हान,ता.23 जुलै ग्राम पंचायत वराडा व्दारे नागरिकांच्या तक्रारीवरून राष्ट्रीय चारपदरी महामार्गा च्या वराडा बस स्टाॅप महामार्गावर जिव मुठीत घेऊन पायदळ पार करावा लागत असुन अपघात वाढत आहे. तसेच बस स्टाॅप च्या जवळपास शाळा व पेट्रोल पंप असल्याने सर्व्हीस […]