दुचाकी व ट्रक अपघातात दुचाकी चालकाचा मुत्यु
कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील पंच बालाजी देवस्थान समोर नादुरूस्त उभ्या ट्रक कुठलेही सुरक्ष निरदेर्शक न लावल्याने नागपुर वरून कन्हान मार्गाने रामटेक कडे जाणा-या दुचाकी चालक ला अंधरात ट्रक दिसुन न आल्याने ट्रक मध्ये दुचाकी धडक ट्रक खाली गेल्याने मनिष नागोत्रा चा झालेल्या अपघातात मुत्यु झाला.
पोलीस स्टेशन अंतर्गत डुमरी शिवारात पंच बालाजी देवस्थान समोरून मृतक हा आपले मोटार सायकलने नागपुर वरुन कन्हान मार्गाने रामटेक कड़े मृतक मनिष रमेश नागोत्रा वय २८ वर्ष राहणार पिवळी नदी नागपुर हा एकटा जात असतांना आरोपी ट्रक चालकाने आपले ट्रक रसत्यावर अवैध उभा करू न कोणत्याच प्रकारचे पार्किंग लाईट व रिफेलकटर रेडियम न लावल्याने उभे केले असता मोटार सायकल चालकाला दिसुन न आल्याने तो ट्रक ला मागुन जाऊन धडकुन ट्रक खाली दुचाकी सह गेल्याने गंभीर जख्मी झाल्याने त्याचा मृत्यु झाल्याने फिर्यादी यांच्या लेखी रिपोर्टवरुन कन्हान पोलीसांनी आरोपी ट्रक चालक विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.२०) सप्टेंबर ला रात्री १०:३० ते १०:५० वाजता च्या दरम्यान मृतक मनिष नागोत्रा मोटार सायकल क्रमांक एम एच ४९ बीपी २१६८ चा चालक हा आपले मोटार सायकलने नागपुर वरुन कन्हान मार्गाने रामटेक कड़े एकटा चालवित जात असतांना डुमरी शिवार पंच बालाजी देवस्थान समोरील राष्ट्रीय माहामार्ग क्र.७ रोडवर आरोपी ट्रक क्र.एम एच ४० बीजी ५७५३ चे चालकाने आपले ट्रक अंधारात राष्ट्रीय महामार्गावर नादुरस्त स्थितीत लोकांचे जिवीतास धोका होईल अशा स्थितीत कोणत्याच प्रकारचे पार्किंग लाईट, रिफे लकटर रेडियम न लावल्याने मोटार सायकल चालका स तो ट्रक दिसला नाही व तो ट्रक ला मागुन जाऊन धडकल्याने अपघातात गंभीर जख्मी होऊन घटना स्थळीच मरण पावला. अपघातास व मृतकांचे मरणास ट्रक चालक कारणीभुत ठरल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांच्या लेखी रिपोर्ट वरून आरोपी ट्रक चालका विरुद्ध कलम ३०४ (अ) २८३ भादंवि नुसार गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यां च्या मार्गदर्शनात पोलीस हेकॉ गणेश पाल हे करीत आहे.