बाप्पाच्या आगमनाने युनिटी रियालिटी कं.व्दारे भव्य रक्तदान शिबीर
रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद, ६५ रक्तदात्यांनी रक्तदान
नागपूर,ता.२३
गणेश महोत्सवाचा दिनाच्या निमित्ताने दीपस्वी युनिटी फाउंडेशन व युनिटी रियालिटी अँड बिल्डर्स प्रा.लि. द्वारे आयोजित रक्तदान शिबिरात ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
दिपस्वी युनिटी फाऊंडेशन व्दारा आयोजीत भव्य रक्तदान शिबीर पंचम अपार्टमेंट, दिक्षीत नगर, नारी रोड, नागपूर येथे शनिवार (दि.२३) रोजी सकाळी दहा ते तीन वाजता पर्यंत जीवन ज्योती ब्लड सेंटरचा सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात स्वयंपूर्ण लोकांच्या प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी कंपनीचे संस्थापक धम्मदीप खोब्रागडे व रवी वर्मा तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन आणि दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी अरुण कुमार वानखेडे उपस्थित होते.
या शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद देत ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरात रक्तदान करण्यात अनेक महिलांनी इच्छा दर्शवली, परंतु वेगवेगळ्या कारणास्तव त्यांना रक्तदान करता आले नाही. महिलांच्या या पुढाकार्याने युनिटी फाउंडेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने च्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला. या रक्तदान शिबिराला युनिटी रियालिटी अंड बिल्डर्स कंपनीच्या मित्रपरिवार व कर्मचारी सहकारी वर्गांनी उपस्थिती दर्शवली.
जीवन ज्योती ब्लड सेंटरच्या सहकार्याने एकुण ६५ रक्तदात्यांचे रक्तदान संकलन करून रक्तदात्यांना टिफीन बाॅक्स, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शिबिराच्या यशस्वी करता रवि वर्मा, किशोर तांडेकर, नंदू कटाने, शुभम पहाडे, अर्जुन कनोजे, गौरव जनबंधू ,अभय पाणतावने, अमन जांभुळकर, अक्षय शेंडे, गजेंद्र शेंद्रे, रजत सावरकर, कोविड मारबते, किशोर बोरकर, आकाश गुगल, अजय बागडे, सुनिल सरोदे अन्य रक्तदात्यांनी सहकार्य केले.
Post Views: 1,005
Fri Sep 29 , 2023
६८ गोवंशाची सुटका करून २५ लाखांचा मुदेमाल सहित ५ आरोपींना अटक कन्हान,ता.२८ पारशिवनी तालुक्यातील कन्हान शहरातील पोलिस स्टेशन हदीतील सिहोरा शिवारात गोशाळेत चालणारे अवैध पशु तस्करीची पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांना माहीती झाल्याने त्यांनी गोवंश कत्तलीकरिता तस्करी करणाऱ्यांवर विशेष पथकाने ६८ गोवंशाच्या जीव वाचवुन २५ लाखांचा मुदेमाल सहित […]