गोंडेगाव पुनर्वसन तक्रारीचे निवारण करून योग्य पुनर्वसन करा – मा. बच्चुभाऊ कडु

गोंडेगाव पुनर्वसन तक्रारीचे निवारण करून योग्य पुनर्वसन करा – मा. बच्चु भाऊ कडु

कन्हान : –  गोंडेगाव पुनर्वसन तक्रारीचे निवारणाकरिता जिल्हाधिकारी कार्यालय नागपुर येथे प्रकल्पग्रस्ता च्या झालेल्या सभेत राज्यमंत्री मा. बच्चु भाऊ कडु हयांनी गोंडेगाव पुनर्वसन तक्रारीचे निवारण करून त्वरित योग्य पुनर्वसन करावे असे अधिकार्‍यांना आदेश दिले. 

     जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे वेकोलि गोंडेगावं खुली कोळसा खदान प्रस्तावित विस्तारणा करिता गोंडेगांव गावाचे पुनर्वसन करण्यात येत आहे. मात्र ज्या जागी गांव वसविले जात आहे तिथे मोठ्या प्रमाणात अव्यवस्था आहे. अनेक विकासकामे अपुर्ण व निकुष्ठ दर्जाची आहेत. आवश्यकते पेक्षा कमी व नियमानुसार भुखंड नसल्याने अनेक नागरिकाना वंचित करण्यात आले. प्रकल्पग्रस्त गावक-यांना योग्य मोबदला, स्थायी नौकरी सह स़्थानिय बेरोजगार तरुणांना खाजगी कंत्राटदाराच्या रोजगारा पासुन डावळण्यात आले आहे. असे अनेक विषय प्रलंबित असताना वेकोली चे अधिकारी वारंवार गाव खाली करून कोळसा खदानचे काम सुरू करण्यासाठी गावक-यांना वेठीस धरत असत्यामुळे सतत २ वर्षापासुन रमेश कारामोरे, ग्रा पं पदाधिकारी हे प्रकल्प ग्रस्तांच्या न्याय हक्का करिता वेकोलि व प्रशासनास तक्रारीच्या निवारणा करिता पाठ पुरावा करित आहेत. दि.९ ऑक्टोबंर ला प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा प्रमुख रमेश कारेमोरे हयांनी गोंडेगाव पुनर्वसन तक्रारीचे निवारण करून योग्य पुनर्वसन करण्याकरिता राज्यमंत्री मा. बच्चुभाऊ कडु , मा. जिल्हाधिकारी नागपुर हयांना दिलेल्या निवेदना वरून मा राज्यमंत्री यांचे निर्देशनाने स्विय सहाय्यक यांचे दुरध्वनीवरून छत्रपती शिवाजी सभागृह जि प नागपुर येथे शुक्रवार (दि.२३) ला २ वाजता मा बच्चु भाऊ कडु राज्यमंत्री जलसंपदा व लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बाल विकास व इतर बहुजन कल्याण विभाग यांचे अध्यक्षेत मा रविंद्र ठाकरे जिल्हाधिकारी नागपुर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, रमेश कारेमोरे, जोगेंद्र कटियारे उपविभागीय अधिकारी रामटेक, वरूणकुमार सहारे, तहसिलदार, वेकोली क्षेत्रिय प्रबंधक, सीएमडी यांचे प्रतिनिधी, नितेश राऊत गोंडेगाँव ग्रा पं सरपंच आदीच्या बैठकीत मा राज्यमंत्री मा बच्चुभाऊ कडु हयांनी अधिका-यांना गोंडेगाव पुनर्वसन तक्रारीचे निवारण करून त्वरित योग्य पुनर्वसन करावे. जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांचा अध्यक्षते त वेकोलीचे अधिकारी व प्रकल्प ग्रस्तांचे प्रतिनिधीची समिती स्थापन करून आठ ८ दिवसात अहवाल साद र करण्याचे आदेश दिले.   

     जो पर्यंत कार्य अहवाल सादर होत नाही तो पर्यंत वेकोलीने सदर गावात काम करणार नाही अशी माग णी रमेश कारामोरे यांनी लावुन धरल्याने मा जिल्हाधिकारी यांनी काम बंद ठेवण्याचे आदेश दिले. बैठकीस सुभाष डोकरीमारे उपसरपंच, आकाश कोडवते, उमेश महाजन, राजु पाटील, शैलेश पाठक, रवि पहाडे, प्रणय खवले सह प्रकल्पग्रस्त नागरिक उपस्थित होते.     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

ऑनलाईन शिक्षण न देताच फी भरण्याचा तगादा   

Sat Oct 24 , 2020
ऑनलाईन शिक्षण न देताच फी भरण्याचा तगादा  #) बिकेसीपी शाळा कन्हानचे फी भरल्याशिवाय पेपर जमा करण्यास नकार.      #) विद्यार्थ्यांचे प्रमोशन न करण्याची धमकी. कन्हान : – येथील इंग्रजी माध्यमाच्या बीकेसीपी शाळे ने ऑनलाईनच्या नावावर शिक्षणाचा बाजार मांडला आहे. विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन न करता विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी घरी पेपर […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta