*खेडी- येसंबा मार्गाचे भुमिपुजन कार्यक्रम थाटात
*१७ लक्ष निधी बांधकामाचे भुमिपुजन
कन्हान –
जिल्हा परिषद नागपुर व येसंबा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खेडी ते येसंबा पोचरस्ता डांबरीकरण १७ लक्ष निधी बांधकामाचे भुमिपुजन कार्यक्रम कैलास बरबटे यांच्या हस्ते पार पाडले.
जिल्हा परिषद नागपुर व येसंबा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खेडी मार्ग ते येसंबा पोचरस्ता डांबरीकरण १७ लक्ष निधी बांध कामाचे भुमिपुजन ( दि.२१)शुक्रवार रोजी
जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे यांच्या हस्ते व येसंबा ग्रामपंचायत सरपंच धनराज हारोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या प्रसंगी येसंबा ग्रामपंचायत सरपंच धनराज हारोडे , उपसरपंच रविन्द्र बांगडे , सदस्य अश्विन डडुरे, पंकेश्वर चकोले, वासुदेव कारेमोरे, प्रेमदास मडावी,
गणेश तांडेकर, हर्षद हारोडे, संजय गजभिये, राजु सहारे सोहन नारनवरे सहीत आदी नागरिक उपस्थित होते.