व्यक्तीमत्व फुलवण्यासाठी कठोर मेहनत घ्या – खुशाल पाहुणे
धर्मराज शैक्षणिक परिसरात विद्यार्थी उत्सवाचे (स्नेहसंमेलन)
कन्हान, ता.२४ जानेवारी
बालवयातच व्यक्तीमत्वाचे अंकुर फुलते त्यामुळे आपल्या मुलांचे चांगले व्यक्तीमत्व घडविण्यासाठी शिक्षकांसोबतच पालकांनी सुध्दा कठोर मेहनत घ्यावी, असे आवाहन विद्यार्थी उत्सवाचे अध्यक्ष खुशाल पाहुणे यांनी केले.
धर्मराज शैक्षणिक परिसरात विद्यार्थी उत्सवाचे (स्नेहसंमेलन) बुधवार (दि.२४) आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक मेहर गुरुजी तर अध्यक्षस्थानी इंदिरा एज्युकेशन सोसायटी पिवळी नदी नागपुरचे संस्थापक अध्यक्ष खुशाल पाहुणे उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.रश्मी बर्वे, माजी सरपंच बलवंत पडोळे, पालक प्रतिनिधी सौ.सोनूताई पोटभरे, उपमुख्याध्यापक प्रकाश डुकरे, मुख्याध्यापक खिमेश बढिये, ज्येष्ठ शिक्षक हरिष केवटे उपस्थित होते. धर्मराज शैक्षणिक संस्थेचा गौरवशाली इतिहास असून रौप्य वर्षात पदार्पण केले आहे. कन्हान परिसरात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून धर्मराजचा नावलौकिक असून चांगला नागरिक घडवित असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.रश्मीताई बर्वे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक प्रकाश डुकरे यांनी करुन शाळेचा गौरवशाली इतिहास विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन भेलकर यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी धर्मराज विद्यालयाचे हरिष केवटे, मोहन भेलकर, उदय भस्मे, संतोष गोन्नाडे, विलास डाखोळे, अनील मंगर, सौ.प्रणाली खंते, सौ.स्वाती मेहर, सौ.हर्षा निंबाळकर, सौ.प्रणाली कोल्हे, धर्मराज माध्यमिक विभागाचे तेजराम गवळी, दिनेश ढगे, सतीश राऊत नरेंद्र कडवे, प्रशांत घरत, सौ कोकीळा सेलोकर, सौ.सरीता बावनकुळे, सौ.छाया कुरुटकर, सौ.माला जिभकाटे, धर्मराज कनिष्ठ महाविद्यालयाचे शिवचरण फंदे, सचिन गेडाम, सौ.योगीता गेडाम, हरिष पोटभरे, विजय पारधी, प्राथमिक विभागाचे भिमराव शिंदेमेश्राम, राजू भस्मे, अमित मेंघरे, किशोर जिभकाटे, सौ.चित्रलेखा धानफोले, कु शारदा समरीत, कु हर्षकला चौधरी, कु.अर्पणा बावनकुळे, कु.प्रिती सुरजबंसी, कु.पूजा धांडे, कु कांचन बावनकुळे, सौ वैशाली कोहळे, शिक्षकेतर कर्मचारी वृंद महादेव मुंजेवार, संजय साखरकर, रतन वंजारी, सौ.सुनीता मनगटे, सौ.सुलोचना झाडे, सौ.नंदा मुद्देवार, सौ.संगीता बर्वे, सौ.परी अनकर यांनी व पालकवृदांनी सहकार्य केले.
Post Views: 728