मराठा-कुणबी सर्वेक्षणाला शिक्षकांचा नकार
सांस्कृतिक कार्यक्रम, परिक्षेत शिक्षक व्यस्त
विद्यार्थ्यांना शाळाबाह्य करुन शिक्षकांना वेठीस का धरता ?
कन्हान, ता. २४ जानेवारी
दहावी बारावीच्या परीक्षा अगदी तोंडावर आल्या असतांना व शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम सुरु असताना मराठा-कुणबी संवर्गातील प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्याचा आदेश सरकारने काढला. त्यासाठी प्रशिक्षणही सुरु केले आहेत. मात्र सर्वेक्षणाचा हा आदेश तत्काळ मागे घ्यावा अन्यथा बहिष्कार टाकण्याचा इशारा विदर्भ प्राथमिक, माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघाने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावी बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी परिक्षा आहेत. सध्या विद्यार्थ्यांच्या सराव परिक्षा सुरु असुन सराव परीक्षेचे मूल्यमापन शिक्षकांना करावयाचे आहे. तसेच परिक्षा अगदी तोंडावर असल्यामुळे शिक्षक आपापल्या अभ्यासक्रमाची उजळणी करित आहेत. विद्यार्थ्यांसाठीचे जानेवारी फेब्रुवारीच्या अखेर पर्यंतचे एक एक दिवस महत्वाचे आहे. अशात जानेवारी महिन्यात शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत मुख्याध्यापक व शिक्षकांना मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाकडुन देण्यात आले आहेत. ऐन परिक्षांच्या तोंडावरच व सांस्कृतिक कार्यक्रम सुरु असल्याने शिक्षक वर्गात चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. एकाच वेळी परिक्षेची, सांस्कृतिक कार्यक्रमाची, राष्ट्रीय सणाची तयारी आणि सर्वेक्षण हि दोन्ही कामे सुरु होत असल्याने बहुतांश शिक्षकांनी यास नकार दर्शविला आहे. जानेवारी व फेब्रुवारी या कालावधित आधिच भरपुर कामे असतात.
शिक्षकाची कमतरता
आधिच शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची कमतरता आहे. अनेक शाळा एक शिक्षकी असुन चार चार वर्ग सांभाळत आहेत. त्यातही त्यांच्या मागे निवडणुक, कुठलेही सर्वेक्षण, शासकीय कार्यक्रम, कुठले तरी प्रशिक्षण अशी अनंत कामाची मालिकाच असते. ते शिक्षक मुलांना शिकवणार कधी ? आणि हि सारी कामे करणार कधी ? या प्रश्नाची उत्तरे कोण देईल ? साधारणपणे अध्यापनानंतर सर्व कामे हि बंधनकारक च असतात. साहजिकच त्यांच्या व्यापाचा परिणाम अध्यापनावर होतो. शिक्षकाच्या नेमणुकी मागे जे मुख्य उद्दिष्ठ आहे, तेच साध्य होत नसेल, तर काय अर्थ आहे.
विदर्भ मुख्याध्यापक संघाने सर्वेक्षणावर बहिष्कार
सर्वेक्षण काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर शिक्ष कांचे पूर्णतः दुर्लक्ष होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भरून न काढणारे नुकसान होणार आहे.
विदर्भ प्राथ मिक, माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ व विदर्भ मुख्याध्यापक संघाने सर्वेक्षणावर बहिष्कार घातला असुन प्रशासनाने या बाबत तातडीने तोडगा काढावा अशी मागणी शिक्षक नेते मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे. निवेदन देतेवेळी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षक नेते मिलिंद वानखेडे, विभागीय सचिव खिमेश बढिये, जिल्हा संघटक शेषराव खार्डे, जिल्हा ग्रामीण संघ टक श्री गणेश खोब्रागडे, टिईटी जिल्हा संघटक भिमराव शिंदेमेश्राम, पारशिवनी तालुका संघटक नरेश तेलकापल्लीवार, महिला संघटिका सौ पुष्पा बढिये आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
Post Views: 740
Wed Jan 24 , 2024
बीकेसीपी शाळेत विज्ञान प्रदर्शनी व हस्तकला प्रदर्शनी संपन्न कन्हान, ता.२४ जानेवारी बीकेसीपी इंग्रजी माध्यम शाळेत विज्ञान प्रदर्शनी आणि हस्तकला प्रदर्शनी मध्ये इयत्ता १ ते १० वी च्या २०० विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रतिकृती सादर करून विज्ञान प्रदर्शनी व हस्तकला प्रदर्शनी थाटात साजरी केली. बीकेसीपी शाळा कन्हान चे संचालक राजीव […]