विधृत ताराच्या शॉटसर्कीटमुळे बोरी येथील पाच एकरातील गव्हाची राखरांगोळी : नुकसान भरपाई मागणी

विधृत ताराच्या शॉटसर्कीटमुळे बोरी येथील पाच एकरातील गव्हाची राखरांगोळी

कन्हान : – पासुन उत्तरेस ७ किमी अंतरावर बोरी (बोरडा) शेत शिवारातील श्री विलास नान्हे हयानी ५ एकरात गव्हाच्या उभ्या पिकात विधृत खंब्याच्या तारा एकमेकाना लागुन झालेल्या स्पार्कच्या ठिणग्या पडुन एकाएक आग लागुन आगीत गहु पिकाची राखरांगो ळी झाली. परिसरातील शेतक-यांनी व प्रशासन अधिकारी कर्मचा-यांनी वेळीच धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविल्याने परिसरातील शेतक-यांची मोठी हानी टळली.


मंगळवार (दि.२२) मार्च २०२२ ला दुपारी बोरी (बोरडा) शिवारातील मारोती वाघमारे यांचे ५ एकर शेत शेतकरी विलास नान्हे हयानी बटई ने करून त्यात गहु लावला होता. आज शेता जवळच्या विधृत खांबा च्या विधृत तारा एकमेकाना लागुन झालेल्या इलेक्ट्रीक स्पार्क च्या ठिणग्या शेतात पडुन दुपारी अचानक शेतातील उभ्या गव्हाच्या पिकास आग लागल्याचे परिसरातील शेतक-यांना दिसताच आरडाओरड करून गावक-यांना एकत्र केले. गट ग्रा प खेडी (बोरी) च्या सरपंचा छाया कोकाटे व उपसरपंचा संगिता देवराव इंगोले हयानी तहसिलदार, पोलीस स्टेशन, पटवारी, अग्निशामक ला माहीती देऊन घटनास्थळी बोलविले. परिसरातील शेतकरी, ग्राप पदाधिकारी, प्रशासन अधि कारी, कर्मचारी व ग्रामस्थानी तातडीने मदत कार्य करून दोन अग्निशामक बंब च्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यत विलास नान्हे च्या ५ एक रातील उभे गव्हाचे पिक आगीने जळुन राखरांगोळी झाली. परंतु आजुबाजुच्या शेतातील गव्हाचे पिक वाचविण्यात यश आल्याने मोठी हानी टळली. ग्रा प सदस्य हरिचंद्र तिरोडे, प्रकाश कोकाटे, रमेश कोकाटे, पो पाटील संदीप नेऊल, अनिल ऊके सह ग्रामस्थ शेतकरी आणि कन्हान पोलीस, अग्निशामक कर्मचारी , मंडळ अधिकारी बी जी जगधने, जे जी मेश्राम, डेकाडे तलाठी एस व्ही पलादूरकर, आर सावाईतुल, एम दुधे, भोसले, भारती वर्मा तसेच कोतवाल शालीक शेंडे आदीने घटनास्थळी पोहचुन सायंकाळ पर्यंत बचाव कार्य केले. घटनास्थळी शेतकरी विलास नान्हे यांचे ५ एकरातील उभे गव्हाचे पिक आगीत जळुन राखरांगोळी झाल्याने शेतक-यांच्या तोंडी आलेला घास आगीने हिसकाविल्याने झालेली नुकसान भरपाई पिडीत शेतक-याला शासनाने तातडीने दयावी अशी मागणी परिसरातील शेतक-यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शहर विकास मंच व नेहरू युवा केंद्र च्या संयुक्त विद्यमाने कन्हान येथे शहिद भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना श्रद्धांजली अर्पण

Thu Mar 24 , 2022
कन्हान येथे शहिद भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना श्रद्धांजली अर्पण #) शहर विकास मंच व नेहरू युवा केंद्र च्या संयुक्त विद्यमाने श्रद्धांजली कार्यक्रम.   कन्हान : – शहर विकास मंच व नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शहिद भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहिद दिवसा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta