टोल टॅक्स नाक्याचे ३ महिन्याने अंतर २० कि मी वरून ६० कि मी होणार – मा. गडकरी
#) पारशिवनी तालुका व्दारे मा. गडकरी साहेबा ना टोल मॅनेजर मार्फत अभिनंदन पत्र पाठविले.
कन्हान : – केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांनी काल संसदेत प्रश्न उत्तरेच्या काळात काही खासदरानी विचा रलेल्या प्रश्नांचे उत्तर सांगतानी त्यांनी नवीन घोषणा केली की अगोदर दोन टोल टॅक्सचे अंतर २० कि मी होते.आता ते अंतर वाढवुन ६० कि मी करण्यात आले असुन त्याची अमल बजावनी येणाऱ्या तीन महिन्यात पुर्ण करण्यात येईल.
कन्हान-कांद्री-बोर्डा रोड वर असलेला टोल हा दोन्ही दिशेच्या टोल वरूण ६० पेक्षा कमी अंतरावर येत असुन आता लवकरात लवकर बंद व्हावे या करीता अभिनंदन पत्र भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे व भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांचे हस्ते कन्हान-कांद्री-बोर्डा रोड टोल नाका मॅनेजर यांच्या मार्फत मा. नितिनजी गडकरी साहेबांना देण्यात आले आणि वाहन चालकाना पुष्पगुच्छ देण्यात आले. हा टोल नाका बंद झाला की कन्हान परिसरातील ट्रक व्यवसाय करणा-या कन्हान-कांद्री-टेकाड़ी येथील व्यावसायिकाना त्याचा लाभ होईल आणि टोल वाचविण्या करिता कन्हान शहरातुन होणारी जड़वाहतुक सुद्धा बंद होईल. याप्रसंगी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपुर (ग्रा) जिल्हा उपाध्यक्ष रिंकेश चवरे , भाजपा महिला पारशिवनी तालुका अध्यक्ष सरिता लसुंते, तालुका उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा, तालुका उपाध्यक्ष मयुर माटे, तालुका महामंत्री सौरभ पोटभरे, प्रसिद्ध प्रमुख भाजपा युवा मोर्चा संपर्क प्रमुख शैलेश शेळके, अमन घोडेस्वा र, प्रसिद्धि प्रमुख, प्रतीक्षा चवरे, दीपंकर गणवीर, राजेन्द्र शेंदरे, सुनील लाडेकर प्रामुख्याने उपस्थित होते.