सावनेर येथे विशाल राममय जागरण एक शाम प्रभू श्री राम के नाम

सावनेर येथे विशाल राममय जागरण
एक शाम प्रभू श्री राम के नाम

सावनेर : स्थानिक बस स्थानक समोर रामनवमी निमित्त एक शाम प्रभू श्री राम के नाम या जागरणाचे आयोजन लोक शक्ती ग्रुप, शिवकृपा ग्रुप व आर्यन ग्रुप सावनेरच्या वतीने करण्यात येत आहे. मध्य प्रदेश येथील परासिया येथील श्री सिद्धेश्वरी जागरण अँड म्युझिकल ग्रुप द्वारा विशाल राममय जागरण आयोजित करण्यात येत आहे. याचबरोबर आयोजकांच्या वतीने प्रभू श्रीरामाची भव्य मूर्ती स्थापन करण्यात येत आहे. सायंकाळी चार वाजता पासून महाप्रसादाला सुरुवात होणार असून प्रभू श्रीरामाचा रथ येताच ढोल ताशे व फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात येईल या सर्व भक्तिमय कार्यक्रमाचा परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

दुःखद समाचार श्री अशोक शंकरराव दहिकर ‌यांचे निधन

Sat Mar 25 , 2023
*दुःखद समाचार* सावनेर शहरातील प्रसिध्द व्यापारी परिवारतील व्यक्तीमहत्व श्री अशोक शंकरराव दहिकर ‌(वय 69) रा.जुना धान्यगंज  यांना आज दिनांक 25/3/2023 सकाळी 8 वाजता दीर्घ आजाराने देवाज्ञा झाली.  त्याची अंतविध दुपारी 4 वाजता रामगणेश गडकरी मोक्षधाम येथे होईल. Post Views: 792

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta