भाग नकाशा, उपयोग प्रमाणपत्र ग्रामीण निंबधक कार्यालयात :- माजी खासदार प्रकाश जाधव *एनएमआरडीए कार्यालयाची स्थापना लोकांच्या हितासाठी की त्रास देण्यासाठी

*भाग नकाशा, उपयोग प्रमाणपत्र ग्रामीण निंबधक कार्यालयात :- माजी खासदार प्रकाश जाधव
*एनएमआरडीए कार्यालयाची स्थापना लोकांच्या हितासाठी की त्रास देण्यासाठी

कन्हान, 22 एप्रिल
जिल्ह्यातील ग्रामीण भागाची प्रगती व्हावी याकरिता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय नागपुरात आहे. याच कार्यालयात ग्रामीण भागातील लोकांना भाग नकाशा, उपयोग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चकरा माराव्या लागतात. हा प्रकार ग्रामीण भागातील लोकांसाठी त्रासदायक आणि खर्चिक आहे. या स्थितीत तातडीने ग्रामीण भागातील शेतीची खरेदी विक्री करणाऱ्या निबंधक कार्यालयातच भाग नकाशा किंवा उपयोग प्रमाणपत्र ऑनलाईन स्वरूपात मिळण्याची व्यवस्था करायला हवी, अशी मागणी माजी खासदार प्रकाश जाधव यांनी केली आहे.
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सभापती मनोज सूर्यवंशी यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रातून त्यांनी या गंभीर मुद्याकडे लक्ष वेधले आहे. जिल्हयातील तालुका पातळीवर उपनिबंधकांचे/रजिस्टारचे कार्यालय आहे. तेथूनच शेती खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. पण जेव्हापासून एनएमआरडीएच्या कवेत ग्रामीण भाग देण्यात आला, तेव्हापासून तेथील नागरिकांना कुठलाही करण्यापूर्वी भाग नकाशा, उपयोग प्रमाणपत्र नागपुरातील एनएमआरडीए कार्यालयातून प्राप्त करावे लागते. याकरिता अर्ज केल्यानंतर तातडीने भाग नकाशा मिळत नाही. याकरिता दोन ते चार दिवस लागतात. अनेकदा आठ दिवसांपेक्षाही जास्त काळ लागू शकतो. शिवाय एनएमआरडीएच्या कार्यालयात अनेक दलाल सक्रिय झाले आहेत. ते मग शेतकऱ्यांना हाताशी धरून त्यांना तातडीने प्रमाणपत्र मिळवून देण्याचे आमिष दाखवतात. यात अनेक शेतकऱ्यांची विनाकारण फसगत झालेली आहे. ही सर्व स्थिती पाहता एनएमआरडीए कार्यालयाची स्थापना लोकांच्या हितासाठी झाली की त्यांना त्रास देण्यासाठी हाच विषय आता ऐरणीवर आला आहे. यावर उपाय उपलब्ध आहेत. ज्या कार्यालयातून शेतीची खरेदी विक्री होणार आहे. तेथेच एनएमआरडीए कडून ऑनलाईन आपला रेकॉर्ड उपलब्ध करून द्यावा. यामुळे शेतकऱ्यांना वारंवार चकरा मारण्याची गरज भासणार नाही. शिवाय उदयास आलेली दलाल संस्कृतीलाही मुठमाती मिळेल. कार्यालयात अनेक दलाल सक्रिय झाले आहेत. ते मग शेतकऱ्यांना हाताशी धरून त्यांना तातडीने प्रमाणपत्र मिळवून देण्याचे आमिष दाखवतात. यात अनेक शेतकऱ्यांची विनाकारण फसगत झालेली आहे. ही सर्व स्थिती पाहता एनएमआरडीए कार्यालयाची स्थापना लोकांच्या हितासाठी झाली की त्यांना त्रास देण्यासाठी हाच विषय आता ऐरणीवर आला आहे. यावर उपाय उपलब्ध आहेत. ज्या कार्यालयातून शेतीची खरेदी विक्री होणार आहे. तेथेच एनएमआरडीएकडून ऑनलाईन आपला रेकॉर्ड उपलब्ध करून द्यावा. यामुळे शेतकऱ्यांना वारंवार चकरा मारण्याची गरज भासणार नाही. यावेळी निवेदन देताना माजी खासदार प्रकाश जाधव, प्रविण जुमडे, राजा रामदार, विलास भोंबले, राजेश तुमसरे, कोटीराम चकोले, मोतीराम रहाटे, सुनिल सरोदे, कमल यादव, अभिमन्यु चावला, राजु बरई, वरघने, सतीश , प्रा.जिवतोडे, प्रकाश काकडे, अशोक मेश्राम आदी उपस्थित होते.

माजी खासदार प्रकाश जाधव
ग्रामीण भागातील लोकांना भाग नकाशा, उपयोग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चकरा माराव्या लागतात. हा प्रकार ग्रामीण भागातील लोकांसाठी त्रासदायक आणि खर्चिक आहे. या स्थितीत तातडीने ग्रामीण भागातील शेतीची खरेदी विक्री करणाऱ्या निबंधक कार्यालयातच भाग नकाशा किंवा उपयोग प्रमाणपत्र ऑनलाईन स्वरूपात मिळण्याची व्यवस्था करायला हवी. शीवाय एनएमआरडीए कार्यालयाची स्थापना करते वेळी शेतकऱ्यांचे मत एकुण घेतले काय ? 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पारशीवनी तालुक्यातून ब्रुक बाॅन्ड कंपनी इतिहास फक्त तोंडावर

Sun Apr 24 , 2022
* रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या युवकांच्या नशीबी परत निराशा * कन्हान शहराच्या भविष्याचा विचार हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड कंपनी कितपत घेणार? * पारशीवनी तालुक्यातून ब्रुक बाॅन्ड कंपनी इतिहास फक्त तोंडावर कन्हान ता, 24 रामटेक विधान सभेतील प्रवेशद्वार असलेले कन्हान शहर सोन्याचा धूर ओकत असल्याची महाराष्ट्र राज्य प्राथमिक स्तरावर ग्रामपंचायत पहील्या क्रमांकाची असुन […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta