भारतीय कोळसा खदान मजदूर संघा तर्फे रक्तदान शिबीर

भारतीय कोळसा खदान मजदूर संघा तर्फे रक्तदान शिबीर

कन्हान,ता.२३ 

   भारतीय कोळसा खदान मजदूर संघ उपक्षेत्र गोंडेगाव कोळसा खुली खदान व्दारे शंभराहुन अधिक कामगारांनी रक्तदान करून भारतीय कोळसा खदान मजदूर संघाच्या स्थापना दिवस थाटात साजरा करण्यात आला. 

     मंगळवार (दि.२३) जुलै ला भारतीय कोळसा खदान मजदूर संघाच्या ७० वा स्थापना दिवस भारतीय कोळसा खदान मजदूर संघ उपक्षेत्र गोंडेगाव कोळसा खुली खदान व्दारे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबीराचे उद्धघाटन आर.बी.वर्मा उपक्षेत्र प्रबंधक, वेकोलि कोळसा खुली खदान गोंडेगाव यांचे हस्ते करण्यात आले. प्रसंगी सरोनी मँडम पर्सनल मँनेजर कोळसा खुली खदान गोंडेगाव, जयंत आसोले, इलियास अहमद आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी डॉ.हेडगेवार रक्त पेढी नागपुर चे डॉ.हर्षा सोनी, किरण इंगळे, सुमित गायकवाड, गीता मेश्राम, प्रिया थुल, प्रियंका तायवाडे, पूजा भंडारकर, सुनिता सहारे, दिपाली, आलिशा, श्रीपाद मोहरील आदी चमुनी व्यवस्थित रक्त संकलन केले. शिबीरात शंभराहून अधिक कामगारांनी रक्तदान करून भारतीय कोळसा खदान मजदुर संघाचा ७० वा स्थापना दिवस थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता नीलम यादव, प्रकाश वायकर, जयप्रकाश चंद्रा, संजय रंगारी, संजय येलपुरे, चंदू घोटेकर, आशिष यादव, सुरेंद्र ठाकरे, संजय कात्यानी, शांतनु कात्यांनी, पितांबर ढेंगे, अजय वाळके सह भारतीय कोळसा खदान मजदूर संघाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यानी सहकार्य केले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

गुरू पौर्णिमेला " गुरूपुजा " गुणवंत विद्यार्थी, पत्रकार व मान्यवरांचा सत्कार संपन्न विकास हायस्कुल माजी विद्यार्थ्यीनी ८० वर्ष पार गुरूजीच्या गुरूपुजेने मार्मिक मंत्रमुग्ध

Wed Jul 24 , 2024
गुरू पौर्णिमेला ” गुरूपुजा ” गुणवंत विद्यार्थी, पत्रकार व मान्यवरांचा सत्कार संपन्न विकास हायस्कुल माजी विद्यार्थ्यीनी ८० वर्ष पार गुरूजीच्या गुरूपुजेने मार्मिक मंत्रमुग्ध कन्हान, ता.२३ प्रतिनिधी      गुरू पौर्णिमा सणाच्या मंगल समयी माजी वर्गमित्र विद्यार्थी परिवार विकास हायस्कुल कन्हान बॅच १९८०-८१ व्दारे डोणेकर सभागृह कन्हान येथे गुरुवर्याची, गुरुजनांची गुरुपुजा […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta