अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या  बहुजन रिपब्लिकन सोश्यालिस्ट पार्टीची मागणी

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या 

बहुजन रिपब्लिकन सोश्यालिस्ट पार्टीची मागणी

कन्हान, ता.२४

     पारशिवनी तालुक्यात सतत होणाऱ्या दमदार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याने बहुजन रिपब्लिकन सोश्यालिस्ट पार्टी व्दारे पारशिवनी तहसिलदार राजेश भांडारकर यांना निवेदन देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.

     पारशिवनी तालुक्यात सतत होणाऱ्या दमदार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याने बहुजन रिपब्लिकन सोश्यालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश माने यांचे निर्देशनुसार आणि प्रदेशाध्यक्ष विशेष फुटाणे यांच्या मार्गदर्शनातं व रामटेक विधानसभा प्रमुख शांताराम जळते यांच्या नेतृत्वात पारशिवनी तहसिलदार राजेश भांडारकर यांना नुकतेच निवेदन देऊन तालुक्यातील सर्वत्र दमदार पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. प्रामुख्याने धान, कापुस, तूर, सोयाबीन यासह अनेक पिकांचे नुकसान होत आहे. तसेच टेकाडी (को.ख.) पारिसरातील पेंढारवाही नाल्याच्या पुरामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतातील पीक सडत असुन शेतात जाणे येणे करण्याचा रस्ता पूर्ण पणे बंद झाला आहे.

     यावर तहसिलदार राजेश भांडारकर यांनी संबंधित विभागाला निर्देश देऊन तसेच वेकोलीचे अधिकाऱ्यांना नुकसानीची माहिती देऊन पाहणी करण्याचे आदेश संबंधिताना दिले आहे. याप्रसंगी बहुजन रिपब्लिकन सोश्यालिस्ट पार्टीचे रामटेक विधानसभा प्रमुख शांताराम जळते, भगवानदास यादव, राजु गुरधे, उमेश गुरधे, सह कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

गुप्ता कोल वॉशरीच्या अन्यायाने स्थानिक शेतकरी, युवा त्रस्त, प्रदुरषणाने आरोग्य धोक्यात घाटरोहना ग्रा.प.चे गुप्ता कोल वॉसरीला निवेदन, मागणी पुर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Wed Jul 24 , 2024
गुप्ता कोल वॉशरीच्या अन्यायाने स्थानिक शेतकरी, युवा त्रस्त, प्रदुरषणाने आरोग्य धोक्यात घाटरोहना ग्रा.प.चे गुप्ता कोल वॉसरीला निवेदन, मागणी पुर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा कन्हान,ता.२४     गट ग्राम पंचायत घाटरोहना एसंबा क्षेत्रात गुप्ता कोल वॉशरी (महामीनरल) च्या कोळसा व केमिकल युक्त दुषित पाणी व धुळीच्या प्रदुषनामुळे परिसरातील शेतकरी, मजुर, युवा […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta