छत्रपती संभाजी नगर येथील सैम्बो कुस्ती राज्य स्तरिय स्पर्धेत नागपुर जिल्हा अवल
बीकेसीपी शाळेच्या खेळाडुंनी स्वर्ण ९, रजत ५, कास्य ११ असे सर्वाधिक पदक पटकावले
कन्हान, ता.२४ ऑगस्ट
महाराष्ट्र राज्य स्तरिय सैम्बो कुस्ती स्पर्धा छ्त्रपती संभाजी नगर येथे नुकत्याच घेण्यात आले. नागपुर जिल्हा खेळांडुनी एकुण ५१ पदक प्राप्त करून राज्यात प्रथम क्रमाकांचे पारितोषिक पटकाविले. यात बीकेसीपी शाळेच्या खेळाडुंनी सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करून ९ स्वर्ण, ५ रजत, ११ कास्य पदक असे २५ पदक प्राप्त करित स्वत:चे, शाळेचे, जिल्हयाचे, गावाचे नाव लौकिक केल्याने परिसरातुन खेळाडू व शाळेचे अभिनंदन करून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र राज्यस्तरिय २०२३-२४ सैम्बो कुस्ती स्पर्धा छत्रपती संभाजीनगर ला घेण्यात आल्या होत्या. यात नागपुर जिल्हयातील खेळाडुंनी १९ स्वर्ण, ११ रजत व २१ कास्य पदक असे ५१ पदक प्राप्त करून नागपुर जिल्हयाने प्रथम क्रमाकं पटकाविला. विशेषत: बीकेसीपी शाळा कन्हान च्या खेळाडू विद्यार्थ्यानी ९ स्वर्ण, ५ रजत, ११ कास्य पदक असे २५ पदक प्राप्त करित स्वत:चे, शाळेचे, जिल्हयाचे व गावाचे नावलौकिक केल्याने परिसरातुन खेळाडू व शाळेचे अभिनंदन करण्यात येत आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील पुणे, संभाजी नगर, कोल्हापुर, सोलापुर, सांगली, नागपुर, वर्धा, नासिक, जलगांव, पिंपरी चिंचवड, अहमदनगर जिल्हयाचे खेळाडु सहभागी झाले होते. स्पर्धेत प्रथम नागपुर जिल्हा, व्दितीय पुणे, तृतिय पिपरी चिंचवड च्या खेळाडुंनी पटकाविला. बीकेसीपी शाळा कन्हान चे सर्व खेडाळु शारिरिक शिक्षक एन.आई.एस कोच अमित राजेंद्र सिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत आहे.
या विजयाने बीकेसीपी शाळेचे संचालक राजीव खंडेलवाल सर, सचिव पुष्पा गैरोला मैडम, मुख्याध्यापिका (माध्यमिक) कविता नाथ मैडम, मुख्याध्यापिका (प्राथमिक) रुमाना तुर्क मैडम, महाराष्ट्र राज्य सैम्बो कुश्ती एसोसिएशन चे सचिव श्री कुमार उगाडे सर, नागपुर जिल्हा एसोसिएशन अध्यक्ष राज जुनजूनकर, शिक्षक विनय कुमार वैद्य सर, यूनिस कादरी सर, सविता वानखेड़े, रेनु राउत सह सर्व शिक्षक, शिक्षिका आणि पालकानी विजेता खेळाडू व प्रशिक्षक अमित ठाकुर सर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post Views: 1,014
Thu Aug 24 , 2023
दुकानात येऊन वाद करणा-यास चाकुने मारून केले जख्मी कन्हान,ता.२३ ऑगस्ट शहरातील अशोक नगर येथे नाटकर पान पॅलेस येथे वाद करणा-या युवकाला चाकुने मारून गंभीर जख्मी केल्याने फिर्यादी च्या तक्रारीने कन्हान पोलीस स्टेशन ला दोन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करित एकास अटक करून पुढील तपास पोलीस करित दुस-या आरोपी […]