कल्पेश बावनकुळे च्या हत्येतील दोन आरोपींना अटक सकरदरा पोलीसांनी आरोपी पकडण्यास केली मौलाती कामगिरी. 

कल्पेश बावनकुळे च्या हत्येतील दोन आरोपींना अटक

सकरदरा पोलीसांनी आरोपी पकडण्यास केली मौलाती कामगिरी

कन्हान,ता.23 सप्टेंबर

      बनपुरी येथील कल्पेश भगवान बावनकुळे हा नागपुर वरून डिजे वाजवुन रात्री घरी दुचाकीने परत जात असताना बोरडा रोडवरील पेट्रोल पंप जवळ दोन अज्ञात आरोपीने दुचाकी अडवुन तिघांना खाली पाडले. तिघेही उठुन पंपकडे पळत असताना कल्पेश ला पकडुन त्याच्या पाठीवर, पोटावर, छातीवर, हातावर व गळयावर धारदार शस्त्राने सपासप ३१ घाव मारून निर्दयतेने हत्या करणारे दोन आरोपी सकरदरा पोलीस स्टेशन च्या सहकार्याने पोलीसांना पकडण्यास यश आले.

      शनिवार (ता.१०) सप्टेंबर २०२२ ला नागपुर येथील गणेश विसर्जनात डिजे वाजविण्याचा ऑर्डर करून डिजे मालक कल्पेश भगवान बावनकुळे (३०) डिजे ऑपरेटर सुरज सुनिल ढोबळे २२ व हेल्पर जितेंद्र रमेश ढोबळे २४ तिघेही रा. बनपुरी ता.पारशिवनी हे नागपुर वरून रात्री ११.३० वा. घरी बनपुरी ला दुचाकी क्र.एम.एच ४९ बी.एल ५६२८ अँक्टीव्हाने परत येत असताना कल्पेश दुचाकी चालवित असुन दोघे मागे बसले होते. कन्हान वरून बोरडा रोडने जात असतांना बोरडा रोड वरील पंपच्या थोडया सामोर काही अंतरावर नागपुर चारपदरी महामार्गा जवळ रात्री १२.३० वाजता दरम्यान अज्ञात आरोपीने त्यांची दुचाकी अडवित दुचाकीसह तिघांना खाली पाडले. ते उठुन जिव वाचविण्यास पेट्रोल पंप कडे पळताना आरोपीने कुठलेही कारण नसतांना कल्पेश ला पकडुन धारदार शस्त्राने पाठीवर, पोटावर, छातीवर, हातावर व गळयावर सपासप ३१ घाव मारून निर्दयतेने हत्या करून आरोपी पळुन गेले होते. तर मागे स्वार दोघे सुरज व जितेंद्र हे पेट्रोल पंप पळुन गेल्याने सुखरूप वाचले. कन्हान पोलीसांनी वडील भगवान राघोबाजी बावनकुळे यांचे तक्रारीने अज्ञात आरोपीं विरोधी अप क्र ५२५/२२ कलम ३४१, ३०२, ३४ भादंवी अन्वये गुन्हा दाखल  करून डीजे मालक कल्पेश बावनकुळे ची अज्ञात आरोपींंने निर्दयतेने हत्या केल्याने ही हत्या डिजे व्यवसायातुन केली असल्याचा प्राथमिक अंदाजा वरून कन्हान पोलीसचे दोन पथक व स्थागुअ शाखा नागपुर ग्रामिण चे पथक हत्येच्या आरोपींताचा शोध घेत १३ दिवस झाल्यावर सकरदरा पोलीस स्टेशन अंतर्गत ताजबाग परिसरात काही दिवसा पुर्वी शेख नौशाद वर आरोपी आशिष उर्फ मोनु मनपिया व अन्य दोन आरोपीने रिवाल्वर तानुन जिवे मारण्याच्या पर्यंत केल्या प्रकरणी सकरदार पोलीसांनी आशिष मनपिया वय ३० रा.भिलगाव, नागपुर व अन्य दोन आरोपी ला अटक करून तपास करित असताना आशीष उर्फ मोनु मनपिया यांनी बोरडा रोड कांद्री कन्हान येथे कल्पेश बवनकुळे यांची हत्या केल्याचे कबुली दिल्याने कन्हान पोलीसांना माहीती दिल्याने यातील आरोपी विक्की क्रिष्णा उके वय ३० रा. जवाहर नगर पांधन रोड कन्हान यास कन्हान पोलीसांनी पहाटे सकाळी कन्हान येथुन पकडुन अटक केली. हत्येत वापरण्यात आलेली चारचाकी वाहन सुध्दा ताब्यात घेतले. तर सकरदार पोलीसाच्या ताब्यात आशिष उर्फ मोनु मनपिया असल्याने कल्पेश बावनकुळे हत्येचे दोन आरोपी अटक करण्यात आले. अन्य आरोपी व मुख्य सुत्रदार व हत्या करण्याच्या उद्देश कन्हान पोलीस तपास करित आहे. कन्हान पोलीसाना आरोपी  विक्की उके चा तपास करण्याकरिता (दि ३०) सप्टेंबर पर्यंत पीसीआर मिळाला आहे. ही कार्यवाही सकरदरा पोलीस स्टेशनचे पी.आय.धनजय पाटील, ए.पी.आव्हाड, एपीआय कशोधन, कामठी उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान, गुन्हे शाखे चे पोलिस निरिक्षक कोकाटे व पथक, कन्हान थानेदार विलास काळे, संपोनि सतिष मेश्राम, एपीआय प्रयाग फुलधेले, नरेश वरखडे,  गणेश पाल, खुशाल रामटेके, मंगेश ढबाले, सम्राट वनपरेती, वैभव बोरपल्ली, अतिश मानवटकर आदी ने सक्रिय सहभाग घेत कामगिरी बजावित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

"सूर नवा ध्यास नवा" सिझन 5 या संगीतमय रियालिटी शो मध्ये कन्हान चा उत्कर्ष वानखेडे ठरला विजेता

Mon Sep 26 , 2022
“सूर नवा ध्यास नवा” सिझन 5 या संगीतमय रियालिटी शो मध्ये कन्हान चा उत्कर्ष वानखेडे ठरला विजेता नागपूर,ता.25 सप्टेंबर      कलर्स मराठी वाहिनी वर यावर्षी “सूर नवा ध्यास नवा” या संगीतमय मालिकेचे सीझन 2 सुरू झाले. उत्कर्ष वानखेडेची ऑडिशन होऊन त्यात निवड झाली. दरम्यान या स्पर्धेत एकापेक्षा एक सरस […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta