शिवसेना पक्षा द्वारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा जाहीर निषेध
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदावरुन राजीनामा द्यावा
कन्हान,ता.२३ नोव्हेंबर
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा वक्तव्याचा कन्हान शिवसेना पक्षा द्वारे आंबेडकर चौक येथे जाहिर निषेध करण्यात आला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. त्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है,” असं वक्तव्य राज्यपालांनी केले. त्यामुळे शिवप्रमेमींचा भावना दुखवल्याने आंबेडकर चौक,कन्हान येथे शिवसेने च्या पदाधिकार्यांनी शिवसेना नेता वर्धराज पिल्ले यांच्या नेतृत्वात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा विरोधात जोरदार प्रदर्शन करुन जाहीर निषेध करीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदावरुन त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख शुभांगीताई घोगले , महिला आघाड़ी शहर प्रमुख मनिषा चिखले, वैशाली थोरात, कुंदा मोटघरे, शिवसेना कन्हान शहर प्रमुख छोटु राणे, चिंटु वाकुडकर, अजय चव्हान, समशेर पुरवले, सोनु खान, योगराज अक्सरे, प्रदीप गायकवाड, हरिष तिडके, अकबर सैय्यद, सुमीत पुरवले, आशिष पात्रे, अमित पुरवले, अंकित साखरे, संजय इंचुलकर, दुर्गेश शेंद्रे , श्रीकृष्ण माकडे, करण पाली, शिव कुरील, भारत धुर्वे, तुलाराम रोडेकर, निखील ठाकरे सह आदि शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
Post Views: 190