शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्याला नऊ महिने सश्रम कारावास
कन्हान,ता.२४ नोव्हेंबर
कन्हान शहरातील पथदिवे लाईट चे काम का नाही केले? असे बोलून 12 वर्षांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी न्यायधीश डी.बी.कदम यांनी ६ महिने सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. मिळालेल्या माहिती नुसार दि. २१/०४/२०१० चे दुपारी १.४५ वा. शासकीय कर्मचारी एम.एस.ई.बी.चे इलेक्ट्रीक मिटर लावण्याचे शासकीय काम करीत होते. प्रविण चंद्रभान सेलारे (३२) रा.पिपरी-कन्हान यांने बोलले की, गावातील स्ट्रीट लाईटचे काम का केले नाही. असे बोलून कर्मचारी युवकाला हातबुक्क्याने मारपीट करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने त्यांच्या वर गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर प्रकरणाचे तपास पोलीस हवालदार राजेंद्र खरबड पो.स्टे.कन्हान यांनी करून प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता न्यायालयात सादर केले होते. मंगळवार दि.२२/ ११/२०२२ रोजी न्यायालयात विद्यमान न्यायाधीश डी.बी.कदम यांनी वरील नमुद आरोपीला कलम ३५३ भादंवि मध्ये ०६ महिने सश्रम कारावास आणि ५ हजार रू. दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद तसेच कलम ५०४ भादंवि मध्ये ०३ महिने सश्रम कारावास व ५ हजार रू. दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकारचे वतीने एपीपी गौरकर यांनी काम पाहीले. न्यायालय कामात पैरवी अधिकारी म्हणुन पोलीस शिपाई सैफुल्लाह अहमद पोलीस स्टेशन, कन्हान यांनी मदत केली आहे .
Post Views: 254