थोर नाटकार,साहित्यिक कै.राम गणेश गडकरी यांच्या पुण्यतिथ निमित्त विनम्र अभिवादन
गणेश वाचनालय,गडकरी युवा मंच,गडकरी स्मृती निलयम,राम गणेश गडकरी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय आदींचे पदाधिकारी,राम गणेश गडकरी संघर्ष समिती व विद्यार्थ्यांसह अनेक गडकरी प्रेमींचा उत्सुफुर्त सहभाग
सिने अभीनेते समीर दंडाळे,रंगकर्मी सोनाली सोनेकार आदिंचा सत्कार
अनेक मान्यवरांनी वाहली भावपूर्ण श्रध्दांजली
सावनेर : थोर नाटकार साहित्यिक, भाषाप्रभू व शेक्सपियर उपाधि ने नावाजलेले कै राम गणेश गडकरी यांचा वारसा जपनार्या सर्व संस्थां,कोवीड़19 च्या वाढत्या संसर्गामुळे सकाळी 9-00 वाजता त्यांचे निवास स्थान,समाधी स्थळ,पुतळा व गणेश वाचनालय येथे पोहचून कै.राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीस अभिवादन करित त्यांना भावपूर्ण श्रध्दांजलि वाहली.
कै.राम गणेश गडकरी यांच्या पुण्यतिथि निमित्ताने पुरातत्व विभागाव्दारे संरक्षीत त्यांचे निवास स्थानावर पुरातत्व विभाग नागपूर च्या सहायक संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश वाचनालय चे अध्यक्ष अँड् चंद्रशेखर बरेठीया,माजी अध्यक्ष अँड् श्रीकांत पांडे,डॉ जयंत कुळकर्णी ,डॉ. विजय धोटे,गडकरी युवा मंच चे अध्यक्ष किशोर ढुंढेले,गडकरी महाविद्यालयाचे अध्यक्ष युवराज टेकाडे,गडकरी स्मृती निलयमचे राजेश पेंढारी, श्याम धोटे सह शेकडो गडकरी प्रेमी व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून भावपूर्ण श्रध्दांजली वाहून थोर नाटककार,भाषाप्रभू,कै.राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीस उजाळा देत समाधी स्थळ,गडकरी पुतळा,गणेश वाचनालय,राम गणेश गडकरी निवासस्थान इत्यादी ठीकाणी पोहचून त्याच्या स्मृतीस अभिवादन करुण श्रध्दांजली वाहली
गडकरी स्मृती निलयम द्वारे सावनेर शहरात कै.राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीस जपणारे तसेच साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्या समाजसेवींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले सीने कलाकार समीर दंडाळे व नवोदित रंगकर्मी सोनाली सोनेकार यांचे शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊण सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तेजसींग सावजी,मुरलीधर पुरे,विठ्ठल ठाणेकार,रघुनंदन जामदार, सुधाकर दहिकर,अँड्.पुरे,राजपुते सर,प्रमोद ढोले,मिना खापर्डे, अश्वीनी दिवटे,कामिनी माडेकर,ज्योती पारधी,संजय बन,सुरेश येवले,राजेश पेंढारी, इंद्रपाल नवधिंगे,आकाश बरवड,प्रकाश तांदुकळर,इंद्रजित बोबार्डे,संज टेम्भेकर,बाबा टेकाडे,अरुण कळंबे सह गणेश वाचनालयचे पदाधिकारी व कर्मचारी तसेच राम गडकरी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
कै.राम गणेश गडकरी यांच्या पुण्यतिथि निमित्त पुरातत्व विभाग नागपूर व्दारे गडकरी निवास स्थानाला सुंदर असे फुल माला व विद्यूत रोशनाई ने तर नगर पालिका सावनेर व्दारे समाधी स्थळ व पुतळ्याची आकर्षक सजावट केली होती .
Post Views: 306