लोकेश बावनकर युवासेना रामटेक लोकसभा जिल्हाप्रमुख पदी नियुक्त
कन्हान ता.२४ जानेवारी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नागपूर जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येणार आहेत. युवासेना रामटेक लोकसभा जिल्हाप्रमुख पदी लोकेश बावनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मा. प्रकाश जाधव माजी खासदार रामटेक लोकसभा यांनी युवासेना रामटेक लोकसभा जिल्हाप्रमुख पदी लोकेश बावनकर यांची नियुक्ती केल्याबाबद पूष्पगुच्छ देऊन अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रसंगी लोकेश बावनकर यांनी सांगितले की, युवासेना जिल्हाप्रमुख म्हणून जी जवाबदारी पक्षाने माझ्यावर सोपवली आहे. तो युवासेना तडा – गडापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी प्रेम रोडेकर जिल्हा उपप्रमुख, विशाल बरबटे रामटेक विधानसभा प्रमुख, प्रभाकर बावणे कन्हान शहर प्रमुख, समीर मेश्राम शहर प्रमुख युवासेना, गणेश मस्के तालुका संघटक, उमेश पौनीकर, श्रावण लोंढे वाहतूक सेना प्रमुख, महेर इंचुकर, प्रकाश पात्रे , रवी रोकडे, आदित्य जांभुळकर, ओजस कुंभालकर, नेवालाल पात्रे, भुरा पात्रे, योगराज अवसरे, सनि कांबळे सह सर्व शिवसैनिकांनी अभिनंदन केले.
Post Views: 222
Sat Jan 28 , 2023
व्यक्तीमत्व फुलवण्यासाठी कठोर मेहनत घ्या-मिलिंद वानखेडे धर्मराज प्राथमिक शाळेत विद्यार्थी उत्सव स्नेह संमेलन कन्हान,ता.२७ जानेवारी बालवयातच व्यक्तीमत्वाचे अंकुर फुलते. त्यामुळे आपल्या मुलांचे चांगले व्यक्तीमत्व घडविण्यासाठी शिक्षकांसोबतच पालकांनी सुध्दा कठोर मेहनत घ्यावी, असे आवाहन विद्यार्थी उत्सवाचे उद्घाटक शिक्षक नेते श्री.मिलिंद वानखेडे यांनी केले. धर्मराज प्राथमिक शाळेत […]