तपस्या फाऊंडेशन रामटेक व्दारे साटक येथे वृक्षरोपण
ग्रा.प.साटक व अखिलेश हायस्कुल चा सक्रिय सहभाग
कन्हान,ता.24 जुलै
तपस्या फाऊंडेशन रामटेक व ग्राम पंचाय त साटक यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र, अखिलेश हाइस्कुल, ग्राम पंचायत परिसर व सिद्ध हनुमानजी मंदिर साटक च्या मैदानात वृक्षारोपण करून जनजागृती करण्यात आली.
शनिवार (दि.२३) जुलै ला तपस्या फाऊंडेशन रामटेक व ग्राम पंचायत साटक यांच्या संयुक विदमाने ग्रा.पंचायत परिसर, सिद्ध हनुमानजी मंदिर साटक च्या मैदानात सरपंचा सौ.सीमाताई यशवंतराव उकुंडे, तपस्या फाऊंडेशन रामटेक च्या अध्यक्षा सौ.सरिता बीरो, उपसरपंच गजानन वांढरे, मुरलीधर वाडी भस्मे, कृष्णाजी देशमुख, चिंटु वाकुडकर आणि ग्रामस्थाच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. तदंतर प्राथमिक आरोग्य केंद्र, अखिलेश हाइस्कुल साटक येथे शालेय विद्यार्थी, शिक्षक प्रदीप निरे, कैलाश हुमने सर, अनमोल मेश्राम सर, जेष्ट नागरिक टेकचंद हिंगण कर, गोविंदा बर्वे, आशीष देशमुख यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी तपस्या फाऊंडेशन चे सरंक्षक कैलाश बीरो यांनी जास्तीत जास्त वृक्ष लावुन पर्यावरणाची जोपासना करित आपले गाव स्वच्छ, सुंदर, निरोगी बनविण्याचे ग्रामस्थाना आवाहन केले. याप्रसंगी नारायणजी कुंबलकर, रमाकांत मुरमुरे, तरूण बर्वे, प्रमोद मोहनकर, अंकित देशमुख, अक्षय आकरे, अरूण लोढे, निकेश हारोडे, मनोज लक्षणे, जीतु हिंगणकर, बेनीराम बीरो सह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन खुबलाल यादव यांनी तर आभार फोटो ग्राफर आकाश तिवाडे यांनी केले.
Post Views: 1,203
Mon Jul 25 , 2022
अवैद्य कोळसा टालवर धाड टाकून तिघांवर गुन्हा दाखल कन्हान, ता.24 जुलै पोलीस स्टेशन हददीत गाडेघाट- पिपरी शिवारातील राणी बगीच्या जवळ अवैध कोळसा टालवर पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी धाड टाकुन तिथे १९२०० रूपया चा चोरीचा अवैध कोळसा मिळुन आल्याने पोलीसांनी पोस्टे ला तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून […]