अवैद्य कोळसा टालवर धाड टाकून तिघांवर गुन्हा दाखल
कन्हान, ता.24 जुलै
पोलीस स्टेशन हददीत गाडेघाट- पिपरी शिवारातील राणी बगीच्या जवळ अवैध कोळसा टालवर पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी धाड टाकुन तिथे १९२०० रूपया चा चोरीचा अवैध कोळसा मिळुन आल्याने पोलीसांनी पोस्टे ला तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आहे.
पोलिसांचा माहिती नुसार वेकोलि कामठी उपक्षेत्र सुरक्षा अधिकारी रविकांत रामदास कंडे हे २३ जुलै ला कर्तव्यावर हजर असतांना सायंकाळी ५ वाजता दरम्यान कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी रविकांत कंडे यांना फोन करून कळविले कि, गाडेघाट शिवार राणी बगीच्या जवळ झाडीझुडपी मध्ये अंदाजे ८ ते ९ टन कोळसाच्या अवैध ढिगारा पडलेला आहे. अश्या माहितीने रविकांत कंडे हे आपल्या कर्मचा-या सह घटनास्थळी पोहचले असता तिथे पोलीस निरीक्षक विलास काळे व पोलीस कर्मचारी हजर होते. त्यानी सांगितले की, सदर कोळसा हा विक्रम तिवाडे, शैलेश आसोले, आकाश भगत यांनी चोरून येथे जमा केला आहे. सदर कोळसा जप्त करून ट्रक मध्ये भरून वेकोलि इंदर खुली खदानच्या काटयावर वजन केले असता कोळसा ४८०० किलो वजन भरल्याने त्याची किंमत १९२०० रुपयाचा कोळसा जप्त केला. या प्रकरणी कन्हान पोलीसांनी वेकोलि सुरक्षा अधिकारी रविकांत कंडे यांच्या तोंडी तक्रारी वरून विक्रम तिवाडे, शैलेश आसोले, आकाश भगत यांच्या विरुद्ध कलम ३७९ , ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
Post Views: 1,003
Sat Jul 30 , 2022
कारगिल विजय दिवसा निमित्य शहिदांना श्रद्धांजली अर्पण कन्हान,ता.30 जुलै कारगिल विजय दिवसा निमित्य युद्धात शहिद झालेल्या वीर जवानांना कन्हान शहर विकास मंच द्वारे तारसा रोड शहिद चौक येथे श्रद्धांजली अर्पण करून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. मंगळवार (दि.२६) जुलै ला तारसा रोड शहीद चौक येथे कार्यक्रमात प्रामुख्याने […]