*अवैधरित्या रेती ट्रक जत्त करून ४ लाख ६४ हजार चा दंड
कन्हान – पारशिवनी तहसील कार्यालय महसुल विभागाचे चे तहासिलहार प्रशांत सागंड़े यांचे गस्त पथक टिम नी कार्यवाही करून कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा सिहोरा येथुन एक ट्रक क्रमाक एम एच ४० वाय ०३६५ हा ट्रक बिन परवाना अवैधरित्या रेती वाहतुक करणारे सिहोरा घाट येथुन ट्रक क्रमांक एम एच ४० वाय ०३६५ चे ,मालक मोटु अंसारी वर २लाख ३२हजार चा दंड लाऊन माईनिगं एक्ट नुसार कार्यवाही करून ट्रक मालक वर माईनिगं एक्ट नुसार कार्यवाही करून ट्रक ला कन्हान पोलिस स्टेशन येथे जमा केले, आणी तसेच दुसरा ट्रक सिहोरा घाट येथुन रेती भरलेला ट्रक केरडी फाटा वरुन महसुल विभागाचे रात्र पथकाने येथे पेट्रोलिंग करीत असतांना केरडी फाटा वर दुसरा ट्रक आढळुन आल्याने पथकाने ट्रक ला थांबवुन पाहणी केली असता ट्रक मध्ये रेती आढळुन आल्याने ट्रक चालकाला विचारपुस केली तर ट्रक चालकांने बिन परवाना , अवैध रेती बिना राॅयल्टी असुन रेती अवैध आढळुन आल्याने तहसीलदार यांचे महसुल विभागाचे पथक यांनी ट्रक तहासिल कार्यालय पारशिवनी ला आणुन ट्रक क्रमाक एम एच ४० वाय ७७७६ ला जब्त करून ट्रक मालक दिनदयाल राहांगडले यांचे मालकी चे आहे. राहागाडले विरोधात २लाख ३२हजार चा दंड लाऊन मायनिंग एक्ट नुसार कार्यवाई चा आदेश देऊन व बिन परवाना अवैध रेती वाहतुक करून रेती चोरी केल्यास ट्रक मालक दिनदयाल राहांगडले याना माईनिगं एक्ट नुसार कार्यवाही करून २ लाख ३२१ लार चा दंड लावण्यात आले.
महसुल विभागच्या व्दारे सुत्रानुसार मिळालेल्या माहिती नुसार शनिवार दिनांक २१ दिसंबर च्या तहसील कार्यालय पारशिवनी चे तहासिलदार प्रशांत सागंडे व गस्त च्या पथकाने बुधवार दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ च्या पहाटे च्या दरम्यान तहसील कार्यालय पारशिवनी चे तहासिलदार प्रशांत सांगडे यांचे पथकाने ही कार्यवाही करत दोनही ट्रक जप्त करून एकुण ४ लाख ६४ हजाराचा दंड करून कार्यवाही करण्यात आली.
रात्र गस्त पथक टिम मध्ये तलाठी संकेत पालादुरकर, तलाठी चौहान, तलाठी माने, कोतवाल सेवक भोंडे सह गस्त पथक सिहोरा व राष्ट्रीय चारपदरी महामार्ग केरडी फाटा येथे पेट्रोलिंग करीत असतांना दोन्ही ट्रक वर प्रत्येकी २ लाख ३२ हजार चा दंड आकारून एकुण महसुल विभागाने ४ लाख ६४ हजार चा दंड ठोकून दोन्ही ट्रक जप्त करून कार्यवाही करण्यात आली.