श्मशान घाट प्रस्तावित नसतांना नगरपरिषद ला बदनाम करण्याचं काम – नगराध्यक्ष
कन्हान,ता.२५ एप्रिल
नागपुर जिल्हयाची जिवनदायणी कन्हान नदी किना-या लगत बीकेसीपी शाळेचा मागे नगर परिषद कन्हान-पिपरी व्दारे शमशान घाट बनविण्याचे प्रस्तावित केले. घाटावर मुतदेहाचा अंतिम संस्कार करताना धुर व दुर्गंधी मुळे शाळेच्या विद्यार्थ्या च्या शिक्षणावर व आरोग्यावर दुषपरिणाम होईल. यास्तव हा घाट येथे न बनविता दुसरी कडे बनविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कन्हान नगरपरिषद व्दारे कन्हान नदी किना-या लगत असलेल्या बीकेसीपी शाळेच्या बाजुला शमशान घाट बनविण्याचा ठराव घेण्यात आला. काही दिवसांनी येथे शमशान घाट बनविल्यास या घाटावर मुत्युदेहाचा अंतिम संस्कार करताना निघणारा धुर व दुर्गंधी ही शाळेच्या वर्ग खोल्यात आणि पटागंणात आदी परिसरात पसरेल.
ज्यामुळे शाळेत नर्सरी ते १० पर्यंत शिक्षण घेणा-या एकुण १५०० विद्यार्थ्याच्या आरोग्यावर, शिक्षणावर, मानसिक दुषपरिणाम मोठया प्रमाणात होणार. यास्तव शाळे लगत शमशान घाट न बनविता दुसरीकडे जिथे सर्व सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही अशा स्थळी बनविण्यात यावे. नगराध्यक्षा नगरपरिषद कन्हान -पिपरी यांना निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.
कन्हान शहर व परिसरातील मुतदेहाचा अंतिम संस्कार करण्याकरिता शमशान घाट कन्हान, नगर परिषद अंतर्गत नसुन नदी पलीकडे कामठी क्षेत्रात कन्हान नदी मध्ये अंतिम संस्कार करावा लागतो. उन्हाळा, पावसाळयात अंतिम संस्कार करण्यासाठी नागरिकाना भयंकर त्रास सहन करावा लागतो. तसेच जाणे येण्याकरीता नविन पुल सुरू झाल्याने रेल्वे क्रॉसिंग गेट बंद झाले. काही दिवसांनी जुना जिर्ण ब्रिटीश काळीन पुला वरून सुध्दा जाणे येणे बंद होईल. नविन शमशान घाट अंत्यत आवश्यक आहे. या करिता नगरपरिषद व्दारे नविन शमशान घाट बीकेसीपी शाळेच्या बाजुला कन्हान नदी किणा-यास बनविण्याचे प्रस्तावित असल्याचा आरोप पत्रपरिषदेत केला. काही दिवसांनी येथे श्मशान घाट बनल्यास शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर व आरोग्याला दुष्परिणाम होतील. शहरातील बीकेसीपी शाळा ही एक मात्र नागपुर जिल्हयात स्टेट बोर्ड इंग्रजी माध्यमाची शाळा चांगल्या शिक्षणाकरिता नावलौकिक असल्याने परिसरातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचविण्याच्या दुष्टीने सुध्दा नगरपरिषदेने महत्व लक्षात घेत प्रस्तावित श्मशान घाट बीकेसीपी शाळे लगत न बनविता दुसरी कडे बनविण्यात यावे. अशी मागणी बीकेसीपी शाळा प्रशासन व्दारे मुख्याध्यापिका कविता नाथ मॅडम यांनी नगराध्यक्षा कन्हान पिपरी यांना निवेदन देऊन मागणी केली. येथील विद्यार्थ्याच्या पालक वर्गा कडुन सुध्दा शाळे लगत श्मशान घाट बनविण्यास विरोध आहे.
==================
सौ.करूणाताई आष्टणकर – नगराध्यक्ष न.प.कन्हान-पिपरी
बीकेसीपी शाळेने केलेला आरोप पूर्णपणे चुकीच्या असून यामध्ये शाळेचा पाठीमागे शमशान भुमीचा विषय ठरावात घेतला गेलेला नाही. दहन भूमी करीता कन्हान शहरात जागा उपलब्ध नाही. त्यामुळे वयोवृद्ध लोकांना दुरवर जाने शक्य नसल्या कारणाने तात्पुरता शमशान भुमीचा व्यवस्था म्हणून जुना पूलाचा खाली तयार करण्याची बोलने झाले. कन्हान नदीच्या काठावर कुठलेही पक्के बांधकाम करणे शक्य नाही. जर बीकेसीबी शाळेच्या मुख्याध्यापिका व व्यवस्थापन मंडळीना शमशान भुमीला घेऊन मतभेद होता. तर मुख्याधिकारी व नगरपरिषद नगराध्यक्ष ला भेटून ठराव कॉपी आणि इतर कागदपत्रे तपासणी केल्यानंतरच पत्रकार परिषदेमध्ये हा विषय मांडला हवा होता. बीकेसीपी शाळा हेतू पुरस्कार कुठल्या तथ्य नसून नगरपरिषद ला बदनाम करण्याचं काम करीत आहे.
Post Views: 889
Wed Apr 26 , 2023
गुरुकृपा आखाडा व्दारे उन्हाळी शिबिराचा शुभारंभ कन्हान,ता.२५ एप्रिल राम सरोवर टेकाडी (को.ख) येथे गुरुकृपा आखाडा व्दारे उन्हाळी शिवकालीन शस्त्र विद्याकले चे प्रशिक्षण शिबीराचा शुभारंभ करण्यात आला. गुरुकृपा आखाडा व्दारे रामसरोवर टेकाडी येथे उष्मकालीन शिवकालीन शस्त्र विद्या कला प्रशिक्षण शिबिराची सुरुवात करण्यात आली. भारतीय […]