खंडाळा येथे लाखोंचा विकासनिधी
आ.जयस्वाल यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन
कन्हान, ता. २५ पारशिवनी तालुक्यातील खंडाळा घाटे येथे आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
जल जिवन मिशन कार्यक्रमांतर्गत ६९ लाख ८४ हजाराच्या निधीतून २० हजार लिटर पाण्याची टाकी आणि ४ हजार १०० मीटर पाइपलाइन काम करण्यात येणार आहे. तसेच खंडाळा घटाटे पोच रस्त्याची दुरुस्तीसाठी १ कोटी, खंडाळा घटाटे पोच रस्ता बांधकाम करण्यासाठी ४० लाख आणि खंडाळा घटाटे येथे गावा अंतर्गत सिमेंट रस्ते बांधकामाकरिता २५ लाख, खंडाळा घटाटे येथे हनुमान मंदिर जवळ सभामंडप बांधकाम करायला १० लाखांची निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच खंडाळा घटाटे येथे बस स्थानक ते हनुमान पडोळे यांच्या घरापर्यंत सिमेंट नाली बांधकाम करण्यासाठी ५ लाख अशा विविध कामांचे भूमिपूजन केले. भूमिपूजन कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे, पंचायत समिती सदस्य नरेश मेश्राम, सरपंच विमलाताई बोरकुटे, उपसरपंच चेतन कुंभलकर, सदस्य रवींद्र केने, वर्षाताई नागपुरे, सविता तेलोते, मनीषा हटवार, स्वप्नील बोरकुटे, अतुल हजारे, प्रेमदास धरमारे, यादोराव कुंभलकर, दिलीप जी हटवार, शंकर वानखेडे, ताराचंद नागपुरे, नारायण हटवार, नितीन पानतावणे, आशिष वानखेडे, प्रमोद केजरकर, जीवन वानखेडे, देवाजी नागपुरे, महादेव नागपुरे, नीतेश तेलोते, स्वप्नील धरमारे, गोपाल राऊत. हर्षल धरमारे, आकाश राऊत, राजेश हटवार, देवराव धरमारे, वैशाली उके, वैशाली चंद्रिकापुरे, संगीता चौधरी, कलावती तेलोते उपस्थित होते. उपसरपंच चेतन कुंभलकर यांनी आभार मानले.
Post Views: 577
Sat Apr 29 , 2023
*वाहनाचा धडकेत हरणाच्या मृत्यू* *कुत्र्याने तोडले लचके…* *वन्यप्राण्याची पाण्यासाठी भटकंती…* सावनेर : सकाळी हेल्थ युनिट येथे मृत अवस्थेत हरिन पडून असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना मिळाली, घटनास्थळी जाऊन पाहिले असता असे लक्षात आले की त्याच्या पायाला वाहनाची धडक लागल्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे. गंभीर अवस्थेमध्ये हरिण हा हेल्थ […]