गजानन महाराज मंदिरात चोरी*
*डाग स्कॉट पाचारण
* सावनेर – सावनेर शहरात चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून एकीकडे दिवसेंदिवस चोरीच्या घटना घडत असून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेची भीती व्यक्त होत आहे. दुसरीकडे स्थानिक पोलिसांच्या रात्रीची गस्त आणि नाकाबंदीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
* काही महिन्यांपूर्वी चोरट्यांनी अनेक दुकानांना लक्ष्य केल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. चोरीच्या काही तुरळक घटनांनंतर आता चोरट्यांनी मंदिरांकडे मोर्चा वळवला आहे.काही दिवसांपूर्वी कडकडी महाराज हनुमान मंदिरात चोरीची घटना घडली होती, सोमवारी रात्री शहरातील प्रोफेसर कॉलनीत असलेल्या श्री गजानन महाराज मंदिरात पूजाअर्चा केल्यानंतर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी कुलूप तोडल्याचा संशय व्यक्त केला जात होता.
स्थानिकांनी सावनेर पोलिसांना माहिती दिली.चोरीच्या या घटनेत अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील 2 दानपेटी व 1 चांदीची मुर्ती असा ऐवज लांबवला व चिल्लर पैसेही फेकून दिले.ही बातमी वाऱ्यावर पसरली आणि लोकांची गर्दी होऊ लागली.परिसराची पाहणी करून डॉग स्कॉट यांना बोलवुन
मंदिर परिसरात आणि आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने चोरांचा शोध घेतला जात आहे. ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पखाले, पोलीस उपविभागीय अधिकारी बापू रोहम, गुन्हे शाखेचे अधिकारी करमलवार, फॉरेन्सिक तपास अधिकारी जितेंद्र कवळे, प्रफुल्ल गौरकर, पोलीस उपनिरीक्षक लोखंडे, अतुल खोडणकर, सुनील तलमले, व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.