कन्हान शहरात स्वच्छता व जंतुनाशक व धुर फवांरणी करून डेंग्यु व आजाराचे नियंत्रण करा
#) काँगेस नगरसेवकांचे मुख्याधिकारी बोरकर यांना निवेदन
कन्हान : – पावसाळ्याच्या ऋतु सुरू असताना अनेक ठिकाणी डबके, गडे, पाणी साचल्याने अनेक जीव जंतु व डासांच्या उत्पती वाढली असुन या डासामुळे डेंग्यु व इतर आजारांच्या रूग्णाचे प्रमाण कन्हान शहरात वाढ होत नागरिकांत चिंतेची बाब आहे. कोरोनाची भीती संपली ही नाही, तर आता डेंग्युची भीती निर्माण होत असल्याने कन्हान नगरपरिषद काँग्रेस नगरसेवकांनी मुख्याधिकारी संदीप बोरकर शी चर्चा करून शहरात स्वच्छते कडे विशेष लक्ष घालुन डेंग्यु नियंत्रणाकरिता जंतुनाशक व धुर फवांरणी करून योग्य उपाय योजने ची मागणी निवेदन देऊन करण्यात आली.
कन्हान शहरात शुध्द पाणी पुरवठा होत नसुन योग्य रित्या साफ सफाई होत नसल्याने जागो जागी केर कचरा, सडलेले कचऱ्याचे ढिगारे, तुडुंब भरलेल्या नाल्या, उगवलेले झाडी झुळुपे, पावसाच्या पाण्याचे डबके हया सर्व गोष्टी डासांच्या उत्पती करिता लाभ दायक ठरत असुन शहरात डेंग्यु व इतर आजाराचे रूग्ण वाढुन नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण होत असल्याने या गंभीर डेंग्युच्या व इतर आजारावर प्राथमिक उपाय योजना म्हणुन संपुर्ण शहरातील प्रभागात जंतु नाशक फवारणी, धुर फवारणी (फॉगिग) आणि जनजागृती लवकरात लवकर करण्यात यावे अन्यथा फार मोठ्या समस्या ला नागरिकांना तोंड द्यावे लागेल. यात काही दुमत नाही. या गंभीर विषयी नगर परिषद कन्हान-पिपरी कॉग्रेसचे नगरसेवक नरेश बर्वे यांच्या नेतुत्वात, माजी उपाध्यक्ष योगेश रंगारी, नगर सेविका गुंफाताई तिडके, रेखाताई टोहणें, पुष्पा कावळकर, नगरसेवक मनीष भिवगडे, विनय यादव, कॉग्रेस कार्यकर्ते प्रशांत मसार, सतिश भसारकर, आकीब सिद्दीकी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.