आदिवासी गोवारी शहिदांना दिली श्रद्धांजली
कन्हान 24 नवंबर
23 नवंबर 1994 ला अनुसुचित जनजाति मध्ये शामिल करण्याचा मागणीसाठी हजारो च्या संख्येत गोवारी समाजाचे लोक विधान भवन मध्ये धडक दिल्यानंतर पुलिसांन कडुन झालेल्या लाठीचार्ज मध्ये 114 गोवारी समाजाचे लोक शहिद झाले.
त्यामुळे 23 नवंबर हा दिवस आदिवासी गोवारी शहिद दिवस म्हणुन साजरा केला जातो.
यावर्षी आदिवासी गोवारी समाज च्या 114 लोकांना बलिदान देऊन 23 नवंबर ला 26 वर्ष पुर्ण झाले असुन कन्हान शहर विकास मंच च्या वतीने गहुहिवरा चौकात 114 लोकांचे बलिदान दिवस वर श्रद्धांजली कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला असुन मंच अध्यक्ष प्रवीण गोडे यांनी गोवारी शहिद स्मारक वर हार माल्यार्पण करुन व सर्व मंच पदाधिकारीयांनी पुष्प अर्पन करुन शहिद झालेले 114 गोवारी समाज च्या बांधवांना दो मिनटाच मौन धारण करुन भावपूर्ण श्रद्धांजलि देण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमात कन्हान शहर विकास मंच के अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष रुषभ बावनकर सचिव प्रदीप बावने, प्रवीण माने, शैलेश दिले,नप नगरसेविका रेखा टोहणे, आनंद साहरे, अनिल पंधराम, पप्पु धाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.