कन्हान ला ११४ आदिवासी गोवारी शहिदांना श्रद्धांजली अर्पण
#) आदीवासी गोवारी समाज संघटन कन्हान व्दारे श्रध्दाजंली कार्यक्रमाचे आयोजन
कन्हान : – आदीवासी गोवारी समाज संघटन कन्हान द्वारे गोवारी शहिद चौक तारसा रोड कन्हान येथे मान्य वरांचा उपस्थित समाजाच्या न्यायीक मागणी करिता नागपुर हिवाळी अधिवेशनात चेंगराचेगरीत शहिद झालेल्या ११४ आदिवासी गोवारी शहिद बांधवांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
नागपुर येथे हिवाळी अधिवेशन सुरु असतांना २३ नोव्हेंबर १९९४ रोजी गोवारी समाजाला आदिवासी दर्जा देऊन १९८५ साली सरकारने काढलेला आदेश रद्द करण्याचा मागणी करिता गोवारी समाज बांधवांनी विधान भवनावर काढलेल्या मोर्चात पोलीसांच्या लाठीचार्ज मुळे झालेल्या चेंगराचेंगरीत आदिवासी गोवारी समाजाचे ११४ बांधव शहिद झाले होते. यात कांद्री कन्हान चे ताराचंदजी भोंडे व कामठी ची कु. करूणा नेवारे ही सुध्दा शहिद झाले होते.
त्याच्या स्मृती प्रित्यर्थ मंगळवार (दि.२३) नोव्हेंबर २०२१ रोजी नागपुर हिवाळी अधिवेशनात झालेल्या घटनेला २७ वर्ष पुर्ण झाल्याने आदिवासी गोवारी समाज संघटन कन्हान व्दारे आदिवासी गोवारी शहिद चौक तारसा रोड कन्हान येथे समाजाचे जेष्ट श्री नारायणराव कावरे याच्या अध्यक्षेत व प्रमुख अतिथी अखिल भारतीय आदिवासी गोवारी संघ नागपुर जिल्हाध्यक्ष भगवान भोंडे, तालुकाध्यक्ष नेवालालजी सहारे, गोगपाचे सुखलाल मडावी, नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, नगर सेवक योगेंद्र रंगारी, राजेंद्र शेंदरे, राजेश यादव आदी च्या हस्ते शहिद ताराचंदजी भोंडे, शहिद करूणाताई नेवारे च्या प्रतिमेस व आदिवासी गोवारी शहिद स्मारकावर पुष्पहार, पुष्प वाहुन, दीप प्रज्वलित करून दोन मिनटाचे मौनधारणाने भावपुर्ण श्रध्दजंली अर्पण करण्यात आली. यावेळी मा. भागवान भोंडे, नेवालालजी सहारे, गोगपाचे सुखलाल मडावी, नगराध्यक्षा करूणा ताई आष्टणकर आदीनी समाजाचे हक्क, एकत्रिकरणा विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कन्हान-पिपरी नगरपरिषद नगरसेवक अनिल ठाकरे, नगरसेविका रेखा टोहणे, गुंफा तिडके, सुषमा चोपकर, पत्रकार कमलसिह यादव, ऋृषभ बावनकर, भरत सावळे, शिव शंकर (चिंटु) वाकुडकर, सोनु मसराम, अशोक पाटील, नरेश सोनेकर, भास्कर राऊत, मनोज कुरडकर, अजय लोंढे, अजय चव्हान, छोटु राणे, हरिष तिडके प्रामुख्या ने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आनंद सहारे यानी तर आभार अनिल ठाकरे हयानी व्यकत केले. यशस्वितेकरिता नेवालाल सहारे, सुखदेव शेंदरे, भोलाजी वगारे, अश्विन राऊत, अरविंद नेवारे, विनोद कोहळे, आरती नेवारे, श्यामलता वगारे, सुशीला सोनवाने, नेवारे ताई, शेंदरे ताई, पंचपोंगले ताई, रेखा ठाकरे, राऊत ताई सह आदिसासी गोवारी समाज बांधव व नागरिकांनी बहु संख्येत उपस्थित राहुन सहकार्य केले.