*कन्हान येथे ३० रक्तदात्यांनी रक्तदान करुन अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती थाटात साजरी*
दणका युवा संघटन महाराष्ट्र व कन्हान शहर विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन
कन्हान : – भारत देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९७ व्या जयंती निमित्य दणका युवा संघटन महाराष्ट्र व कन्हान शहर विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत हनुमान मंदिर गांधी चौक, पोलीस स्टेशन जवळ कन्हान येथे भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन या भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमात ३० रक्तदात्यांनी रक्तदान करुन अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .
शनिवार दिनांक.२५ ला देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९७ व्या जयंती निमित्य सकाळी ९ ते दुपारी २ वाजता पर्यंत पंचायत श्री हनुमान मंदिर गांधी चौक, पोलीस स्टेशन जवळ कन्हान येथे भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित दणका युवा संघटन महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष योगेश वाडीभस्मे , कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या हस्ते माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय श्री अटल बिहारी , डॉ बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता डॉ हेडगेवार रक्त केंद्र चे किरण इंगळे , कल्पना काळे , प्रियंका पवार , अनुप कापटे , प्रणाली शेंडे यांचा सहकार्य ने ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले असुन रक्तदात्यांना बैग , प्रमाण पत्र , व खाद्य सामग्री वाटप करुन सत्कार करण्यात आला असुन कार्यक्रमात उपस्थित नागपुर ग्रामीण पत्रकार संघ चे जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे , कन्हान ग्रामीण पत्रकार संघ जेष्ठ पत्रकार मालवीय सर , उपाध्यक्ष कमलसिंग यादव , पत्रकार विवेक पाटील , सह आदिं ना बैग देऊन सत्कार करुन अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे , महामार्ग पोलिस दिपक काॅंक्रेटवार , कन्हान – पिपरी नगरपरिषद चे नगरसेवक राजेंद्र शेंदरे , राजेश यादव , विनय यादव , नगरसेविका गुंफा तिडके , खंडाळा घटाटे ग्रामपंचायत माजी सरपंच व विद्यमान सदस्य रविंद्रजी केने , दणका युवा संघटन कन्हान शहर अध्यक्ष विनोद किरपान , रामभाऊ दिवटे , सामाजिक महिला कार्यकर्ता तुलेषा नानवटकर ,वर्षा सिंगाडे , अजय लोंढे , भरत सावळे , महेंन्द्र चव्हान , प्रशांत मसार , सचिन वासनिक , मयुर माटे , विनोद कोहळे , संजय चहांदे , दिपक तिवाडे , सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता दणका युवा संघटन संस्थापक अध्यक्ष योगेश वाडीभस्मे , कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर , दणका युवा संघटन जिल्हाध्यक्ष महेश कारेमोरे, शहराध्यक्ष सुरेश वैद्य, पारशिवनी तालुका शैलेश शेळके, मौदा तालुका विरेंन्द्र पायतोडे, कन्हान शहर विकास मंच उपाध्यक्ष महेंद्र साबरे, सचिव हरीओम प्रकाश नारायण, महासचिव सुरज वरखडे, कोषाध्यक्ष महेश शेंडे , रिंकेश चवरे , पत्रकार दिनेश नानवटकर , सह पदाधिकार्यांनी सहकार्य केले .