शीदें सरकार असतांना सामान्य शेतकऱ्यांना आपल्या हक्कांसाठी जेल
पोलीस प्रशासन शेतकऱ्यांचे नसुन कंपनीचा मालकीचे
कन्हान दि.२५ डिसेंबर
गुप्ता कोळ वसारीसमोर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी (दि.२५) डिसेंबर ०२२ रोजी शनिवार रात्री ताब्यात घेतल्याने संतप्त ग्रामस्थांनी रविवारी सकाळपासून पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला.
पारशिवणी तालुक्यातील गोंडेगाव वेकोली लगत वराडा व मौजा एसंबा येथे महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळा द्वारे महा मिनरल मायनिंग व बेनिफेकिशन लिमिटेड कोल वाशरी चा प्लांट मार्च २०२१ ला सुरू करण्यात आला. कोल वॉशरी मध्ये गोंडेगाव कोळसा खदान व इतर खदान येथुन येणा-या कोळस्याला वॉश करण्यात येत असल्याने या उडणा-या कोळसा धुरा मुळे वराडा, एंसबा, वाघोली व घाटरोहणा मौजा येथील ६०० एकरा वर शेती प्रदुषित झाली असुन, कोळसा धुर मिश्रीत पाण्यामुळे जमिनीचे पाणी ही प्रदुषित झाले आहे. धुळकणामुळे गावक-यांचे आरोग्य धोक्यात आले आहे
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने क्लोजर नोटिस दिल्या नंतरही ही कंपनी बंद करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ कंपनीची मदत करीत असल्याचे दिसुन येत आहे. आज उद्या बैठक लावुन विषय मार्गी लावु असे सातत्याने आश्वासन दिले जात होते. यामुळे त्रस्त झाल्यालेल्या शेतकरी व जय जवान जय किसान संघटनेने कोल वॉशरी समोर शुक्रवार (दि.२३) डिसेंबर २०२२ ला ही कोल वॉशरी बंद करण्यासाठी आंदोलन केले. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी अशोक करे यांना फोन वर चर्चा करून ही कोल वॉशरी तात्काळ बंद करावी व कंपनी ला कुलुप लावावे अशी मागणी केली असता त्यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सचिव प्रविण दराडे यांच्या सोबत संवाद करावा असे सांगितले. यावेळी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रविण दराडे यांच्या सोबत फोन वर चर्चा करून बेकायदेशीर सुरू असले ली ही कोल वॉशरी ताबडतोब बंद करावी अन्यथा बेमुदत आंदोलन करू असे सांगण्यात आले. प्रशासनाने ही मागणी मान्य करीत पोलिस बंदोबस्तात कंपनीला कुलुप लावले. (दी.२४) तारखेपासून कोल वसारीसमोर धरणे आंदोलन करीत कोळसा उत्खनन बंद करण्यात आले.
२४ रोजी दुपारी १.३० वाजता आंदोलन करणाऱ्या २० शेतकर्यांना पोलिसांनी उचलून पोलीस वाहनात बसवून नगर परिषदेच्या नवीन इमारतीत बंद करण्यात आले. त्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने (दी.२५) डिसेंबर रोजी सकाळपासून वराडा सरपंच रेखा चिखले यांच्या नेतृत्वाखाली महिला व पुरुष शेतकरी पोलीस ठाण्यात जमा होऊ लागले. कोळसा वसारीतून आणलेल्या शेतकऱ्यांना सोडण्याची मागणी करत कोळसा वसारीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत होते. दरम्यान, जय जवान जय किसानचे अध्यक्ष प्रशांत पवार, माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी, काँग्रेस नेते चंद्रपाल चौकसे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, पंचायत समिती सभापती मंगला निंबोण, नरेश बर्वे, बबलू बर्वे यांच्यासह बखारी, गोंडेगाव, जुनी कामठी येथील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. येसंबा, निलज, नांदगाव आदी गावातील सरपंचांनीही धरणे आंदोलनाला पाठिंबा देत पोलीस ठाणे गाठले. वाढता दबाव पाहून दुपारी चार वाजता आणलेल्या शेतकऱ्यांना सोडले.
उल्लेखनीय आहे की, वराडा सरपंच रेखा चिखले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कोळ वसारीसमोर धरणे आंदोलन केले. ज्यामध्ये सावनेरचे आमदार सुनील केदार, सरपंच संघाचे अध्यक्ष चंद्रपाल चोकसे, जय जवान जय किसान अध्यक्ष प्रशांत पवार होते.
Post Views: 382
Mon Dec 26 , 2022
हे सरकार, शासन, पोलीस प्रशासन शेतक-यांचे की, उद्योगपती चे ? आंदोलन दडपण्यास व चोरीने कोळसा ट्रक काढण्यास शेतक-यांना अटक करून नगरपरिषदेत कोंबले कन्हान,ता.२६ डिसेंबर ( सुनिल सरोदे) महामिनरल मायनिंग व बेनिफेकिशन लि. (गुप्ता़) कोल वॉशरीच्या प्रदुषणाने त्रस्त वराड़ा, वाघोली, एसंबा घाटरोहणा व गोंडेगावच्या शेतक-याचे आंदोलन दडपण्यास व चोरीने […]