निरपराध राहुल सलामे मृत्यूच्या निषेधार्थ कॅण्डल मार्च
अपराधीक प्रवृत्तीच्या लोकांसोबत असल्याच्या आरोप चुकीचा
– नरेश बर्वे
कन्हान,ता.२७ फेब्रुवारी
निर्दोष राहुल पंचम सलामे युवकांचा पोलीसांच्या मानसिक व शारीरिक यातनेतून उपचारार्थ शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्याचा आरोप करीत घटनेचा निषेध म्हणून पोलीसांच्या विरुद्ध अंतिम संस्काराचा दिवशी आंदोलन केले. पोलिसांनी सात दिवसांत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र दहा दिवस होऊन सुध्दा कोणतीही जवाबदारी स्वीकारली नाही. या घटनेचा निषेध म्हणून आदिवासी समाज बांधव आणि परिवार द्वारे सोमवार (दि.२७) फेब्रुवारी रोजी सायंकाळी कॅण्डल मार्च काढुन न्याय देण्याची मागणी केली.
शहरातील राष्ट्रीय महामार्गावर (दि.३) शुक्रवारी आठवडी बाजारात असामाजिक तत्वाच्या गुंड्यांनी हातात तलवार, काठी, फिरवुन धुमाकुळ घालीत दहशत निर्माण केली होती. रस्त्यांनी जाणाऱ्या येणाऱ्या सर्व सामान्य नागरिक दुकानदारांना मारहाण करून दुकानांचे सामान फेकुन वाहनांची तोडफोड केली.या प्रकरणी कन्हान पोलीसांनी मुख्य आरोपी खैलेश पंचम सलामे, शुभम पंचम सलामे, यांचा भाऊ मृतक राहुल पंचम सलामे याला घटनेच्या दिवशी घरा मधून चौकशीसाठी उचलण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी दुपारच्या दरम्यान राहुल सलामे यांची प्रकृती खालवल्याने उपचारा करिता मेयो रुग्णालय नागपुर येथे भर्ती करण्यात आले. राहुल च्या प्रकृती मध्ये सुधार आल्याने त्याला १२ फेब्रुवारी ला डिस्चार्ज करण्यात आले. परंतु १५ फ्रेब्रुवारी ला राहुल सलामे याची प्रकृती अचानक खालवल्याने त्याला उपचारा करिता मेयो रुग्णालय नागपुर येथे भर्ती करण्यात आले. (दी.१७) फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता त्यांचा मृत्यू झाला.
राहुल सलामे याचा मृत्यु नंतर रविवार (दि.१९) फेब्रुवारी ला सायंकाळी आदिवासी समाज बांधवांन सह शैकडो नागरिकांनी माजी खासदार प्रकाश जाधव व गोंडवाना गणतंत्र पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरीष उईके यांचा नेतृत्वात पोलीस स्टेशन चा घेराव करुन धरणा प्रदर्शन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांच्या कडुन कारवाई चे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन शांत झाले होते. परंतु राहुल सलामे याचा मृत्यु प्रकरणी दोषी अधिकाऱ्यावर वर कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्याने आज सोमवार (दि.२७) फेब्रुवारी ला सायंकाळी ६ वाजता निर्दोष मृतक राहुल पंचम सलामे यांचा गर्भवती पत्नी व अडीच वर्षाचा मुलगी, वृद्ध आई -वडिलांना न्याय देण्याचा मागणी करिता निषेध कॅण्डल मार्च चे आयोजन करण्यात आले होते. निषेध कॅण्डल मार्च तारसा चौक येथे मृतक राहुल पंचम सलामे याला श्रद्धांजलि अर्पित करुन राष्ट्रीय महामार्गावरील पोलिस स्टेशन, गांधी चौक होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समापन करण्यात आले.
यावेळी माजी खासदार प्रकाश जाधव, राजेंद्र मुळक, नरेश बर्वे यांच्या नेतृत्वात कँडल मार्च मध्ये वडिल पंचम सलामे, आई रूपलता सलमे, पत्नी बबली, दिड वर्षाची मुलगी सह माजी खासदार मा. प्रकाश भाऊ जाधव, माजी मंत्री, कॉग्रेस कमेटी नागपुर जिल्हा अध्यक्ष मा. राजेंद्र मुळक, उपाध्यक्ष नरेश बर्वे, गोंडवाना गणतंत्र पार्टी प्रदेश उपाध्यक्ष शुकलाल मडावी, जिल्हा उपाध्यक्ष रामलाल पट्टा, महासचिव गुड्ड भाऊ उईके, रामटेक तालुका संघटक राधेश्याम टेकाम, पारशिवनी तालुका संघटक राजेश टेकाम, शहराध्यक्ष सोनु मसराम, गगन सीरसाम, रवी पंधरे, संदीप परते, सुरज वरखडे, राहुल टेकाम, समीर मेश्राम, माजी नप नराध्यक्षा अँड आशा पनिकर, रीता बर्वे, सुनिता मानकर, राखी परते, रेखा टोहणे, नगरसेवक मनिष भिवगडे, आकिब सिध्दीकी, सुत्तम मस्के, बाळा मेश्राम, रोहित बर्वे आदी सह मोठया संख्येने आदिवासी समाज बांधव व नगरवासी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कॅन्डल मार्चला कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दहा अधिकारी पन्नास कर्मचारी यांच्या चोख बंदोबस्त करण्यात आला होता. यावेळी घटनास्थळी पोलीस विभागीय अधिकारी मुक्तार बागवान व वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद माकेश्वर सोबत अधिकारी उपस्थित होते.
अपराधीक प्रवृत्तीच्या लोकांसोबत असल्याच्या आरोप चुकीचा
कन्हान शहरात काही लोकांचा गैरसमज आहे की, शहरातील ग्रामीण भागातील काँग्रेस अपराधिक लोकांच्या सोबत असून त्यांना मदत करत आहे. पण मात्र आम्ही अपराधिक लोकांना पाठीशी घालत नसून सलामे यांचा मुलगा राहुल सलामे याची अपराधिक पार्श्वभूमी नसून निरपराध होता. त्यामुळे त्याला न्याय देण्यासाठी आणि त्याचा घरच्यांना प्रशासनाकडून मदत मिळण्याकरता आम्ही सोबत आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांसोबत कुठल्याही पद्धतीचा संवेदना नाही. लोकांमध्ये चुकीचा समज आहे ते त्यांनी डोक्यातून काढून टाकावे. जेणेकरून असा प्रसंग निर्दोष व्यक्तीच्या वाटेला जर की आला, आम्ही नेहमी अशा लोकांचा पाठीशी राहून नेहमी मदत करू
नरेश बर्वे काँग्रेस उपाध्यक्ष ग्रामीण नागपूर.
Post Views: 1,078
Tue Feb 28 , 2023
आदमने महाविद्यालयाच्या खेळाडूंनी मारली बाजी. 60 किलो गट कबड्डी स्पर्धा. सावनेर तालुका प्रतिनिधी : तालुक्यातील खुबाळा येथे जय बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीने 60 किलो वजन गटाची कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत नागपूर […]