राष्ट्रीय पदक विजेते बीकेसीपी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सत्कार
कन्हान,ता.२८ फेब्रुवारी
सैम्बो रेसलिंग चॅम्पियन शिप खेळाची राष्ट्रीय स्पर्धा महाराष्ट्रातील संभाजी नगर येथे पार पडली. यात नागपुर जिल्हयाने वीस पदक पटकाविले असुन बीकेसीपी शाळेच्या विद्यार्थी खेडाळुनी अकरा पदक जिकुन शाळेचे नाव लौकीक केल्याने या विजेते खेडाळुंचा शाळेच्या वतीने थाटात जल्लोषात सत्कार करण्यात आला आहे.
संभाजीनगर, महाराष्ट्र येथे ( दि.२६ ते ३०) जानेवारी दरम्यान सैम्बो रेसलिंग चॅम्पियन शिप खेळाचे आयोजन केले होते. या राष्ट्रीय स्तरावरील खेळात बीकेसीपी शाळेतील २३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हा खेळ अतिशय कठिण असुन देखील विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. या खेळात नागपुर जिल्हाने स्वर्ण १०, रजत ०६ व कास्य ०४ असे २० पदक प्राप्त केले. बीकेसीपी शाळेतील विद्यार्थ्यानी स्वर्ण ०७, रजत ०३ व कास्य ०१ असे ११ राष्ट्रीय पदक जिकुन प्राविण्य प्राप्त करित स्वत:चे, आई वडिलांचे आणि शाळेचे नाव गौरान्वित केल्याने सोमवार (दि.२६) फेब्रुवारी ला बीकेसीपी शाळेच्या पटांगणात सत्कार घेण्यात आला.
समारंभात विजेत्या खेडाळुचे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नाथ मॅडम, प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीमती रूमाना मॅडम, जेष्ट शिक्षक विनयकुमार वैद्य यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, विविध भेट वस्तु देऊन जल्लोषात सत्कार करून प्रोत्साहित करण्यात आले. पदक विजेते विद्यार्थ्यी खेडाळुनी आपल्या यशाचे श्रेय क्रिडा शिक्षक अमितसिंग ठाकुर सर यांना दिले. यावेळी नाथ मॅडम आणि अमित सर यांनी आपल्या मार्गदर्शनातुन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. पालक अनिल मगर यांनी मुलांना प्रोत्साहन पर दोन शब्द संबोधित केले.
मोतीराम रहाटे व शांताराम जळते यांनी शाळेला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा सुंदर प्रतिमा भेट देऊन गौरव केला. प्रसंगी अजय ठाकरे, रविन्द्र कोटपल्लीवार, सुभाष मदनकर, अमित उमरे, राजेंद्र मानकर, सचिन यादव, शर्मा सर, शारिक अंसारी, योगेश्वर खरवार, संतोष सिंग, निक्खी सिरिया, क्रीर्ती बोरकर, शिल्पा सिरिया, आरती कोटपल्लीवार सह विजयी विद्यार्थ्यांचे पालक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन ज्योत्सना लांजेवार यांनी करून संपुर्ण कार्यक्रम शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वृंदानी अतिशय आनंदाने यशस्विरित्या पार पाडत जल्लोषात साजरा केला.
Post Views: 649
Tue Feb 27 , 2024
चंद्रपाल चौकसे, लॉयन्स क्लब यांचा संयुक्त पुढाकाराने – शव पेटी दान कन्हान, ता.२७ फेब्रुवारी शहरात शव पेटीची नागरिकांना कमतरता भासत असल्याने ही अत्यंत महत्वाची गरज लक्षात घेत पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे यांनी लॉयन्स क्लब नागपुर लिजेट डिस्ट्रीक ३२३४ एचआय च्या संयुक्त सहकार्याने कन्हान नगरपरिषदेला शव पेटी दान देऊन सार्वजनिक […]