पो. अ़धिक्षक राकेश ओला हयांनी वाहन चालक व नागरिकांना कोव्हीड विषयी केली जनजागृती
कन्हान : – स्व:ईच्छा कडक लॉकडाऊन च्या पहिल्या दिवसी कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड चौकात नाकेबंदी दरम्यान पोलीस अधिक्षक मा.राकेश ओला साहेबानी भेट देऊन दुचाकी, चारचाकी वाहन चालकास व वयोवृध्द नागरिकांना थांबवुन कोव्हीड संदर्भात माहीती देत जनजागृती करित विना मास्क, विनाकारण फिरणा-या लोकांवर कार्यवाही करण्यात आली.
सोमवार (दि.२६) ला दुकानदार, नगरपरिषद व पोलीस प्रशासना व्दारे लोकहितार्थ स्व:ईच्छा कन्हान ला कडक लॉकडाऊन च्या पहिल्या दिवसी तारसा रोड चौक कन्हान येथे नाकेबंदी सुरू असताना नागपुर ग्रामिण पोलीस अ़धिक्षक मा. राकेश ओला साहेबानी भेट दिली असता उपविभागीय पोलीस अधिकारी कामठी, कार्यालय कन्हान मा. एम एम बागवान, परी. पो. उप अ़धिक्षक, कन्हान थाने़दार मा.सुजितकुमार क्षिरसागर, ईतर अधिकारी व अमलदार उपस्थित अस ताना पोलीस अधिक्षक मा राकेश ओला साहेबानी येणा-या जाणा-या दुचाकी, चारचाकी वाहन धारकांना व वयोवृध्द व्यक्तीना थाबवुन कोव्हीड-१९ संबंधात माहीती दिली आणि वयोवृध्द व्यक्तीना घरा बाहेर न निघण्या बाबत सविस्तर माहीती देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच विना मास्क, विनाकारण फिरणा-या नागरिका विरोधात दंडाची कार्यवाही करण्यात आली.