कन्हान ते रामटेक बंडखोर आमदारा विरूध्द निषेध
गांधी चौक रामटेक येथे निषेध सभा संपन्न झाली.
कन्हान : – बंडखोर आमदार आशिष जैस्वाल यांच्या निषेधार्थ 27 जून रोजी माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात कन्हान ते गांधी चौकात रैली काढुन दुपारी एक वाजता निषेध सभा घेण्यात आली. माजी खासदार प्रकाश जाधव म्हणाले की, आमदार आशिष जैस्वाल हे शिवसेनेच्या नावावर तीन वेळा निवडून आले. पक्षामुळे तो मोठा झाला. मात्र शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत पक्षाचा विश्वासघात केला आहे. शिवसैनिक त्यांना विसरणार नाहीत. याची किंमत त्याला येत्या निवडणुकीत चुकवावी लागेल. त्यांच्या विरोधात संपूर्ण रामटेक विधानसभा मतदार संघातील शिवसैनिकात रोष आहे. हा आता
गल्ली ते संपुर्ण क्षेत्रात पाहायला दिसेल. शिवसेना पक्षाने जैस्वाल यांना खनिज महामंडळाचे अध्यक्ष केले. तरी सुध्दा बंडखोरा सोबत गोहाटी ला पोहचले. आणि गद्दार झाल्याने आता गद्दाराला माफी नाही. यावेळी रामटेक पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवुन आंदोलन दाबण्याचा पर्यंत पोलीसानी रामटेक बस स्टाप वर शिवसैनिकाना अडवुन केला होता. शिवसैनि क रसत्यावर उतरल्यास कोणीही अडवु शकत नाही हे आज दाखवुन दिले. रामटेक उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चव्हाण, पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी पोलिसांचा चोख कडक बंदोबस्त ठेवला होता. बसस्थानकावरून पायदळ रॅली काढुन शेवटची सभा गांधी चौकात घेऊन निशेष नोंदविला.