स्वच्छ सर्वेक्षण अभियान व माझी वसुंधरा अंतर्गत स्वच्छता संदेश
कन्हान,ता.२७ जुलै
नगर परिषद कन्हान-पिपरी क्षेत्रात आनंदधाम बहुद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, रामटेक व नगर परिषद कन्हान-पिपरी यांच्या संयुक्त विद्यामानाने नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर व लक्ष्मणराव मेहर व्यसनमुक्ती गौरव पुरस्कृत यांच्या नेतृत्वात स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अंतर्गत स्वच्छता संदेश देणारी प्रभात फेरी व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर स्वच्छता संदेश देणारी प्रभात फेरी नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर, उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी व लक्ष्मणराव मेहर यांच्या नेतृत्वात कन्हान शहरातील मुख्य रस्ता व वस्त्यांमध्ये फिरविण्यात आली.
सदर प्रभात फेरीत नारायण विद्यालय, बळिरामजी दखणे हायस्कूल, आदर्श विद्यालय, जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, भारतरत्न इंदिरा गांधी महाविद्यालय, कन्हान चे शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सदर फेरीत विद्यार्थ्यांनी हातात विविध स्वच्छता संदेश फलक पकडून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला.
तसेच आनंदधाम बहुद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, रामटेक च्या सदस्यांनी आपले मोलाचे योगदान दिले. फेरी संपन्न झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांचे स्वागत व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी सर्वांनुमते दखणे हायस्कूल च्या मुख्याध्यापिका सौ.ठमके मॅडम यांच्या नेतृत्वात स्वच्छतेची शपथ घेतली.
प्रसंगी फेरीत कन्हान-पिपरी नगराध्यक्षा सौ. करुणाताई आष्टणकर, उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी व लक्ष्मणराव मेहर व आनंदधाम ट्रस्ट चे सर्व सदस्य, विजय हटवार तसेच नगरसेवक राजेंद्र शेंदरे, राजेश यादव, नगरसेविका रेखाताई टोहणे, पुष्पा कावडकर, मोनिका पौनीकर, संगीता खोब्रागडे, वंदना कुरडकर, सुषमा चोपकर, वर्षा लोंढे, कल्पना नितनवरे, गुंफा तिडके शिक्षक वर्ग, न.प.कर्मचारी वर्ग हर्षल जगताप, फिरोज बिसेन, नामदेव माने, रविंद्र धोटे, कु. प्रांजली सांभारे, निरंजन बढेल, देवीलाल ठाकूर, महेश बढेल, नेहाल बढेल, प्रमोद समुंद्रे, उमेश कठाणे, श्रीमती मनीषा लाहोरी, रुख्मिनी दरबेसवार, अनीता यादव, विजयालक्ष्मी नायडू, अरविंद देशमुख, विठ्ठल खाटीक, स्वप्नील बेलेकर, आषीश गुंडूकवार, रविंद्र पाहुणे, शुभम काळबांडे, शुभम येलमुले, आशिक पात्रे, मयूर डफरे व इतर कार्यालयीन कर्मचारी व सर्व सफाई कर्मचारी यांनी आपले मोलाचे योगदान देऊन फेरीला यशस्वी रूप दिले व शहरातील नागरिकांना स्वच्छतेबाबत जागृत केले.
Post Views: 784