*कोराणा आजाराने मृत रक्तसबंध वारसदारांना शासकीय योजनेत लाभ
* रक्तसबंध वारसदारांना शासकीय योजनेत लाभार्थी म्हणुन समाविष्ठ
कन्हान ता.26 सप्टेंबर
मागील काही महिन्यांपासून कोराणा विषाणु व्हायरसचा तीव्र गतीने फैलाव होत असल्याने त्याचाच प्रदुर्भाव हा अनेक सामान्य कुंटूबातील नांगरीकांना व कुंटूब प्रमुखांना या जिवघेणा आजाराचा लागणमुळे जिव गमवावा लागला आहे पण कुंटुबाचे आधारवड ,प्रमुखांना आपला परीवाराचा उदरनिर्वाह, उपजिवीका चालविण्याकरीता दैनंदिन कामकाज करणे ही अती आवश्यकही आहे. अशातच या कोराणा विषाणु आजाराचा विळाख्यात अडकुण व आपला बचाव करण्याकरीता औषधोउपचार करीता लागणारा खर्च, आयुष्यातील जमापुंजी रोख रक्कमचा स्वरूपात लावुनही स्वतःचा जिव गमवावा लागत आहे.त्यामुळे अशा परिस्थीतीत नांगरीकांचा कुंटूंब प्रमुखांचा वारसदारावर दुखाचे सावट ,डोंगर कोसळल्यासारखे झाले असून आर्थिक परिस्थीती आतिशय गंभीर व बिकट अंधकारमय झाली आहे अशा कुंटूबाना आपला उदरनिर्वाह व सुक्षतेसाठी जगण्याकरीता वणवण भटकांव लागत आहे हा विषय गंभीर असून कोराणा व्हायरसचा आजाराणे कमी वयात मृत पावलेले कुंटूबप्रमुखांचा वारसदांना कमीत कमी 20 वर्षाचा आतील रक्ताचा नात्यातील सदस्यांना संकटमय समस्येतून बाहेर निघण्याकरीता व त्यांचा उज्वल भविष्याचा विचारकरीता त्यांना महाराष्ट्र सरकारचा विविध शासकीय योजनेत समाविष्ठ करूण शासकीय योजनेचा लाभ द्यावा जेणे करुण खऱ्या लाभार्थाना लाभ मिळेल अशा ज्वलंत समस्येच निवारण करण्याकरीता कन्हान पिपरी येथील प्रशांत बाजीराव मसार यांच्या नेतृत्वात सौ.रश्मीताई बर्वे अध्यक्ष जिल्हा परीषद नागपूर, मा.जिल्हाधिकारी साहेब, नागपूर यांचा मार्फत मा.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार यांच्या सोबत चर्चा करुण निवेदन देण्यात आले.
यावेळी उपस्थीत प्रशांत बाजीराव मसार, प्रदीप बावणे, चंदन मेश्राम, दिपक तिवाडे, शिवशंकर भोयर, आनंद भुरे, रामु कावळे, विशाल ढोमणे, पकंज खंगारे, संजय गुडधे, शुभम खांडेकर, लिलाधर साबरे, विक्की वाडीभस्मे आदींनी केली.