*पाराशिवनी तालुकाचे दहा ग्राम पंचायती वर प्रशासक नियुक्ती
बिडीओ बमनोटे यांची माहीती*
कमलसिंह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी
पाराशिवनी (ता प्र):-महाराष्ट्र ग्राम पंचायत सुधारणा अध्यादेश २०२० अन्वये महाराष्ट्र ग्राम पंचायत आधिनियम कलम १५१मधिल पोट कलम (१)मध्ये खंड (क) मध्ये परंतुका नंतर जर नैसार्गिक आपत्ती किवां प्रशासाकिय अडचणी किंवा महामारी ईत्यादी मुळे राज्य निवडणुक आयोगचा वेळापत्रका नुसार ग्राम पंचायत ची निवडणुका घेणे शक्य नसेल तर राज्य शासनच्या ग्राम पंचयती चा प्रशासक म्हणुन योग्य व्यक्तीचा नियुक्ती करता येईल अशी तरतुद आहे ,उपोदघात नमुद २व ३ अन्वये मुख्य कार्यकारी आधिकारी यांना ग्राम पंचायत चे प्रशासक नियुक्ती बाबत अधिकार प्रदान कर०यात आलेले आहे.
त्या अर्थाअपोदघातात नमुद शासन राजपत्र अधिसुचना महाराब्ट्र शासन निर्णय व उच्च न्यायालय मुबंई यांचे दिनांक २२जुलाई२०२०,१४अगस्त २०२० चे आदेशन्वये आहे सेव्टेबर २०२०मध्ये मुदत संवणारय ग्राम पंचायत करिता सहपत्र मध्ये नमुद अधिकारी यांची ग्राम पंचायत प्रशारसक पदावर नियुक्ती कर०यात आली आहे. पारशिवनी तालुकात कार्यकाळ संपलेल्या ग्राम पंचायतीवर प्रशासक नेमण्याचे आदेश शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने दिले आहे. त्यामुळे पाराशिवनी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा कार्यकाळ संपलेल्या १० ग्राम पंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक म्हणून विस्तार अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्राम पंचायतीचा कारभार या विस्तार अधिकार्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आगामी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुदत संपलेल्या व संपणार्या ग्राम पंचायतीना विद्यमान सरपंच, सदस्यांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होती. दरम्यान राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले होते. प्रशासक हा संबधित जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या सल्लाने नियुक्त करावा, असेही आदेशात नमुद करण्यात आल. परंतु, या बाबीला घेवून विरोधी सुर उमटण्यास सुरूवात झाल्याने प्रशासक पदी शासकीय अधिकार्याची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुरूप जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा कार्यकाळ संपलेल्या ग्राम पंचायतींमध्ये प्रशासकांची नियुक्ती केली जात आहे.
त्यातच तालुक्यातील १० ग्राम पंचायतींच्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये
(१)खंडाळा(घटाटे)ग्रा पं विजय नाईक (विस्तार अधिकारी,पंचायत)
(२)बोरी (सिगांरदिप)ग्रा पं, मनोजकुमार शहारे (विस्तार अधिकारी,पंचायत),
(३)पिपळा(परसोडी)ग्रा पं, विलास लठठाड(विस्तार अधिकारी,कृर्षि),
(४)ईटगाव(दिगलवाडी)ग्रा पं , विलास लठठाड(विस्तार अधिकारी,कृर्षि)
(५)सुवरधरा ग्रा पं ,विजय नाईक,(विस्तार अधिकारी,पंचायत)
(६) नवेगाव (खैरी)ग्रा पं ,विलास लठठाड(विस्तार अधिकरी,कृर्षि)
(७)माहुली ग्रा पं ,मनोजकुमार शहारे,( विस्तार अधिकारी,पंचायत),
(८)आमगांव(बाबुलवाडा)ग्रा पं,मनोजकुमार शहारे,पंचायत)
(९)निमखेडा ग्रा पं , विजय नाईक,(विस्तार अधिकारी,पंचायत)
(१०) खेडी, ग्रा पं विजय नाईक,(विस्तार अधिकारी,पंचायत)
, या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीवर वेगवेगळ्या विभागाचे विस्तार अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यामुळे ग्राम पंचायतीचा कार्यभार विस्तार अधिकार्यांच्या खांद्यावर आला आहे. अशी माहीती खंड विकास अधिकारी,प्रदिप बमनोटे यांनी दिली