सावनेर राष्ट्रीय लोकन्यायालयात 1132 प्रकरणे निकाली.
सावनेर त प्रा: स्थानिक न्यायालयात आज दिनांक 25 /9/ 2021 ला राष्ट्रीय लोकन्यायालय आयोजित करण्यात आले होते. पॅनल क्र एक चे न्यायाधीश जे एस कोकाटे व पॅनल क्रमांक दोनचे , सहदिवानी न्यायाधीश पी पी नातू, यांच्या अध्यक्षतेत एकूण 1132 प्रकरणे निकाली काढण्यात आली. आतापर्यंतचा हा विक्रमी आकडा समजण्यात येत आहे. यामध्ये पूर्व खटला म्हणजे कोर्ट कारवाई सुरू होण्याच्या अगोदर अश्या 600 प्रकरने,02 दिवाणी खटले, 465 फौजदारी खटले,49 बँक सेटलमेंट इतर 16 अशा एकूण 1132 प्रकारे निकाली काढण्यात आली. त्यामुळे सर्वत्र परीसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी दोन्ही पॅनलचे सदस्य एडवोकेट ए बी मुलमुले, एडवोकेट शैलेश जैन, एडवोकेट एम जी पाटील, एडवोकेट खंगारे यांनी सेवा पुरविल्या. ह्या प्रसंगी एडवोकेट चंद्रकांत पिसे ,एडवोकेट भोजराज सोनकुसरे, एडवोकेट मनीष गुडधे पाटील, एडवोकेट काळे, व पॅनल वरील कर्मचारी ए सी जुमडे, डी एन कापसे, डी ए चौधरी, एन बी पायडे,के एन तेलघरे, ए बी सुरकार, पी एल पवार, एम एफ नेवारे व एम एल इंगळे यांनी प्रकरणे निकाली काढण्यात मोलाचे कार्य केले.