कामठी : संविधान दिना निमित्त डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना माजी राज्यमंत्री व ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख अॅड . सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ . बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे भारतीय प्रास्ताविकचे वाचन ड्रॅगन पॅलेस टेम्पल कॅम्पस , दादासाहेब कुंभारे परिसरात असलेले डॉ . बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे संविधान दिना निमित्त माजी राज्यमंत्री व ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख मा . अॅड . सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत परमपुज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृति पुतळयाला माापण करून मानवंदना देतून भारतीय संविधानाच्या प्रास्ताविक वाचण्यात आले भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवसाच्या महत्वप्रवासाने २६ नोव्हेंबर १ ९ ४७ ला भारतीय संविधान भारत देशाला अर्पण केले . या संविधानात ३ ९ ५ कलमे व नऊ परिशिष्टे आहेत . भारतीयांनी २६ नोव्हेंबर १ ९ ४७ ला संविधान अंगीकृत आणि अधिनियमीत केले . आज २६ नोव्हेंबर २०२० ला भारतीय संविधनाला ७१ वर्षे पूर्ण झाले अशी माहीती देत असतांना डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक भारतीय संविधानाद्वारे प्रत्येक भारतीय नागरीकांना समानतेचा अधिकार दिला त भारतीय राज्य घटनेचा जगामध्ये कुठेही तोड नाही , असे गौरवोद्गार मा . अॅड . सुलेखाताई कुंभारे यांनी मार्गदर्शन करते वेळी केले .
या प्रसंगी कामठी शहराचे नगराध्यक्ष शाहजहाँ शफावत , बरिएम चे जिल्हा अध्यक्ष श्री . अजयभाऊ कदम , छावणी परिषदचे उपाध्यक्ष श्री दिपक सिरीया , तहसिलदार श्री . गणेश जगदाळे , कामठी नगर परिषदचे मुख्याधिकारी श्री . संदीप बोरकर , नविन कामठी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक श्री . संतोष बाकल , जुनी कामठी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री . विजय मालचे , नगरसेविका सावला सिंगाडे , नगरसेवक श्री . दिनेश स्वामी , श्री . अफजल अंसारी , रेखा भावे , श्री . उदास बंसोड , श्री . सुभाष सोमकुवर , श्री . नारायण नितनवरे , श्री . मनोहर गणविर , श्री गणेश सेंगर , श्री . राजेश गजभिये , तसेच ओगावा सोसायटी , हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था , दादासाहेब कुंभारे बहुऊद्देशिय प्रशिक्षण संस्था , ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल चे शिक्षकवृंद व कर्मचारी , दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी चे शिक्षक त शिक्षकेत्तर कर्मचारी ईत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते .