कन्हान शहरातील नागरिकांच्या पक्के पट्ट्याची घेतली दखल
मंत्री सुनील केदार यांचे आश्वासन
कन्हान 24 जानेवारी
कन्हान शहरात ता.24 जानेवारीला महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री मा. ना.सुनीलबाबू केदार यांनी शहरातील विविध समस्या बाबत दौरा करून पाहणी केली.
सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष चंद्रशेखर भीमटे यांच्या हस्ते मंत्री सुनीलबाबू केदार व रश्मी बर्वे यांचा शाल श्रीफळ व संविधान देऊन सत्कार करण्यात आला.सुरेश नगर येथील जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन हजारो कार्यकर्त्यासमक्ष समस्या जाणून घेतल्या त्यात त्यात कन्हान शहरातील पिपरी, पिपरी टोली,सिहोरा, धरमनगर,आनंदनगर,सत्रापुर व अन्य भागात 40 ते 50 वर्षापासून नियमित वास्तव्य करीत असणाऱ्या नागरिकांना शासकीय जागेवर पक्के पट्टे देण्याची मागणी यावेळी रॉकाचे जिल्हाउपाध्यक्ष चंद्रशेखर भीमटे यांनी मंत्री सुनीलबाबू केदार यांच्याकडे केली. यावर केदार यांनी निवेदन स्वीकारून मार्च महिन्यापर्यंत संबंधित विभागाला निर्देश देऊन त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाला जी.प.अधेक्षा रश्मी बर्वे,माजी आमदार एस.क्यू.जमा,काँग्रेसचे नेते नरेश बर्वे,दयाराम भोयर, माजी सरपंच देविदास जामदार,रिता बर्वे,बबलू बर्वे,ग्रामीण पत्रकार संघ कन्हान चे अध्यक्ष रमेश गोडघटे इत्यादीसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन भीमराव उके तर आभार विवेक पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या येशस्वीतेसाठी माजी जी.प.सदस्य अंबादास खंडारे, रॉकाचे तालुका अध्यक्ष मोरेश्वर खडसे,विधानसभा कार्याध्यक्ष अशोक पाटील,शहर महासचिव नरेश सोनेकर, हरीचंद्र मेंढे,महादेव वाढवे, शंकर थुटे, यादव सोमकुवर, सूत्राम ढोके, शिवपाल माटे, यशवंत मेश्राम, अशोक डडूरे सुभाष धोके,रामेश्वर शेंडे,सलीम सिद्दीकी,संजय खडसे,वर्मा लोंढे,इशरत हातागडे,सुनील शेंडे, इत्यादीसह असंख्य कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.