सावनेर मध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
* शासकीय निम शासकीय कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण
* स्वातंत्रता संग्राम सेनानींचा शाल श्रीफळ देऊण सन्मान
सावनेर ता : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नगरातील सर्व शाळा शासकीय निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहन करणात आले यात नगर पालिका येथे नगराध्यक्षा रेखाताई मोवाडे यांचे हस्ते तर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांचे हस्ते व स्वातंत्रतेचे प्रतीक माणले जाणारे जयस्तंभ बाजार चौक येथे शहर काँग्रेस अध्यक्ष पवन जैस्वाल यांचे हस्ते सचिव विजय बसवार यांचे उपस्थितीत व इतर गणमान्यांच्या उपस्थितीत सामुहिक ध्वजारोहण पार पडले.
सकाळी 9-30 ला नगर परिषद हायस्कूल च्या पटांगणावर उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या हस्ते तहसीलदार प्रताप वाघमारे , पो.नी. मारुती मुळूक ,, नगराध्यक्षा रेखाताई मोवाडे , पंचायत समिती सावनेर चे विस्तार अधिकारी दिपक गरुड , मुख्याधिकारी हर्षला राणे , नायब तहसीलदार गजानन जवादे , प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर च्या प्रपाठक डॉ . मंजुषा ढोबळे , डॉ . संदीप गुजर , डॉ . शिवम पुण्यानी , अँड् . शैलेश जैन आदींच्या प्रमुख उपस्थितीत नगरातील नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी पोलीस पथक , होमगार्ड पथक , एनसीसी पथक आदिंनी पथ संचालन करुण राष्टध्वजाला मानवंदना दीली . ध्वजारोहणानंतर स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले