सलामे कुंटूबाला ५ लाखाची सहायता व पत्नीस नोकरी द्यावी- माजी आ.रेड्डी
मुख्यमंत्री शिंदे व गृहमंत्री फडणवीस यांना निवेदनातून मागणी
कन्हान,ता.२८ फेब्रुवारी
पोलीस विभागाने तपासाकरिता ताब्यात घेतलेल्या निर्दोष राहुल पंचम सलामे ची प्रकृती बिघडून उपचारा दरम्यान दगावला. आदिवासी राहुल सलामे च्या कुंटुबाला त्वरित मुख्यमंत्री सहायता निधीतुन ५ लाख रूपयाची सहायता करावी. कुटुंबाचा उदर्निवाह करिता विधवा पत्नीला शासकिय नौकरीत समाविष्ट करण्याची मागणी मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणविस यांना निवेदनातून माजी आ.डी.मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केली.
शुक्रवार (दि.३) फेब्रुवारी ला कन्हान बाजारात तलवार बाजी प्रकरणी आरोपी खैलेश व शुभम सलामे यांना न पकडता निर्दोष भाऊ राहुल सलामे ला पोलीसांनी मध्यरात्री ३ वाजता घरून ताब्यात घेतले. पो.स्टे ला तपास करित असताना दुपारी त्यांची प्रकृती खराब झाल्याची पत्नी ला फोनवर माहिती दिली. राहुल ला मेयो शासकिय रूग्णालय नागपुर येथे उपचारार्थ दाखल केले. शुक्रवार (दि. १७) फेब्रुवारी ला आदिवासी राहुल सलामे चा उपचारा दरम्यान मुत्यु होऊन निर्दोषाचा नाहक बळी गेल्याने या प्रकरणातील तपास पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचा-याची खातेनिहाय चौकसी करून योग्य कारवाई करण्यात यावी. मृतक राहुल सलामे ला दिड वर्षाचा मुलगा असुन पत्नी बबली गरोदर व आई वडिल वृध्द आहे. राहुल सलामे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नसुन तो कुंटुबाचा कर्ता पुरूष असल्याने त्याचे कुंटुबाचा उदर्निवाहचा प्रश्न निर्माण झाल्याने कुटुंबावर उपासमारीची पाळी आली. याकरिता त्वरित ५ लक्ष रूपये मुख्यमंत्री सहायता निधीतुन करून त्यांच्या पत्नीला शासकिय नोकरीत समाविष्ट करून आदिवासी समाजाला न्याय द्यावा. अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणविस यांना निवेदन पाठवुन माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केली आहे.
Post Views: 703
Tue Feb 28 , 2023
सिलिंगच्या लोखंडी कडीला गळफास लावून आत्महत्या कन्हान,ता.२८ फेब्रुवारी नागपूर- जबलपूर महामार्गावरील जुन्या पोस्ट कार्यालयाचा बाजूला मृतक कोमल पाटील यांने राहत्या घरी सिलिंगचा लोखंडी कडीला दोराच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने राकेश पाटील यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल केला. प्राप्त माहिती नुसार, मृतक कोमल चिंतामण पाटील (वय […]