कन्हान नदी पुलावर पुन्हा गड्डे पडुन सळाखी बाहेर आल्याने अपघाताची शक्यता
शासन, प्रशासन, अधिकारी निद्रा अवस्थेत
पुलाच्या बांधकामाची चौकशी करून दंडात्मक कारवाई होईल का ?
कन्हान,ता.२८ फेब्रुवारी
कन्हान नदी वरील नवनिर्मित पुलाचे उद्घाटन होऊन फक्त सहा महिन्याचा कालावधीत दोन ते तीन वेळा मोठ मोठे गड्डे पडुन सळाखी दिसु लागले. दैनिकात बातमी प्रकाशित होताच गड्डे बुजवून फक्त लीपापोती करण्यात आली. परत पुन्हा गड्डे पडुन सळाखी दिसु लागल्याने मोठ्या अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नविन पुलाच्या बांधकामावर प्रश्न निर्माण झाले असुन सुध्दा स्थानिक जनप्रतिनिधी, शासन, प्रशासन, अधिकारी निद्रा अवस्थेत असल्याचे भासवुन कुठे गहाळ झाले कळत नाही. या पुलाच्या बांधकामाची चौकशी करून संबधितावर दंडाष्मक कारवाई होईल का ? असे प्रश्न नागरिकांच्या चर्चेतुन उधाण येत आहे.
कन्हान नदी नवनिर्मित पुलाचे भुमिपुजन २०१४ वर्षी तत्कालीन केंद्रीय मंत्री मा.ऑक्सर फर्नांडिस यांचे हस्ते आणि तत्कालीन खासदार मुकुल वासनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. पुल तीन वर्षात पुर्ण होण्याचे आश्वस्त केल्या नंतर मध्यंतरी घडलेल्या राजकीय घडामोडी मुळे पुलाचे कार्य संथ गतीने सुरु होते. या पुलाचे बांधकाम तारकुंडे एण्ड कंपनी द्वारे करण्यात आले. पुलाच्या बांधकामाला जवळपास आठ वर्ष लागली. १ सप्टेंबर २०२२ ला केंद्रीय मंत्री मा.नितिन गडकरी यांच्या हस्ते विधान परिषद आमदार मा.चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्मित पुलाचे उद्घाटन करण्यात आले. श्रेय लाटण्याकरिता काही जनप्रतिनिधी व राजकिय मंडळी चांगलीच तत्परता दाखवित जणु स्पर्धाच लागली होती. पुलावर वाहन उभे करून थांबले असता वाहने जाताना पुल खालीवर बबलींग करतो. तेव्हा पुल पडतो की, काय अशी चांगलीच भिती वाटत असते.
सदर समस्येचे गांभीर्य लक्षात घेत कन्हान शहर विकास मंच पदाधिका-यांनी व सदस्यांनी विधान परिषद आमदार चंद्रशेखर बावनकुळे, रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल व संबंधित अधिका-या मार्फत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना निवेदन पाठवुन पुलाच्या बांध कामाची चौकशी करुन दोषी अधिका-यावर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली होती. तरी सुद्धा मा. नितिन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जैस्वाल व संबंधित विभागाच्या अधिका-यांनी सदर विषयाला केळाची टोपली दाखविली. आता परत पुन्हा पुलावर गड्डे पडुन सळाखी दिसु लागल्याने शासन, प्रशासन, अधिकारी आणि जनप्रतिनिधी पुलावर मोठ्या अपघाताची वाट तर पाहत नाही ना?
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी कन्हान पुला च्या बांधकामाची सखोल चौकशी करुन जनतेच्या पैश्याचा पुल बांधकामात गैरप्रकार करित अवाढव्य खर्च करून ही जनता जनार्धनास त्रास सहन करावा लागत असल्याने यांची शहानिशा करून जनतेच्या पैश्याचा दुर्पयोग करणाऱ्या संबधित अधिकारी व कंत्राटदारावर कठोर दंडात्मक कारवाई होईल का ? अश्या चर्चेला नागरिकांत उधाण येत आहे.
Post Views: 693
Wed Mar 1 , 2023
राष्ट्रीय १७ व्या आष्टेडू मर्दानी आखाडा स्पर्धेत व्दितीय पुरस्कार सुवर्ण पदक प्राप्त खेडाळुला परीसरातुन अभिनंदनाचा वर्षाव कन्हान,ता.०१ मार्च तामिळनाडु येथे झालेल्या राष्ट्रीय १७ व्या आष्टेडु मर्दानी आखाडा स्पर्धेत महाराष्ट्राने व्दितीय पुरस्कार प्राप्त केला आहे. यात परमात्मा एक दांडपट्टा मर्दानी आखाडा निमखेडाचे खेळाडु गौरव बावने, साक्षी सुर्यवंशी व उर्वशी […]