*शेतकरी शंकरराव वानखेडे यांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतुन आर्थिक मदत करण्याची मागणी*
#) तहसील वरुण कुमार सहारे यांच्या मार्फत कन्हान शहर विकास मंच चे मुख्यमंत्र्यांना निवेदन
कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात मंगळवार दिनांक १८ मे २०२१ ला आलेल्या चक्रीवादळा सह अवकाळी वादळ, वारा, पाऊसा आल्याने खंडाळा (निलज) गावाला लागुन असलेल्या कोठात विज पडुन शेतकरी शंकरराव वानखेडे यांच्या शेतातल्या एका बैलाचा मृत्यु झाला आहे . ऐन शेतीचा कामा च्या वेळी भंयकर नुकसान झाल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच उपाध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार वरुण कुमार सहारे यांच्या मार्फत मुख्यमंत्री मा.श्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवुन तात्काळ मुख्यमंत्री सहायता निधीतुन आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे .
मंगळवार दिनांक.१८ मे २०२१ ला कन्हान शहरात व परिसरात अचानक आलेल्या चक्रीवादळा सह अवकाळी वार्यासह पाऊस आल्याने खंडाळा (निलज) येथील शेतकरी शंकरराव महादेव वानखेडे यांच्या गावाला लागुन असलेल्या कोठावर विज पडुन कोठात बांधुन असलेल्या एका बैलाचा मुत्यु झाला. ऐन शेतीच्या कामा सामोर अवकाळी पाऊसासह विज पडुन एका बैलाचा मृत्यु झाल्याने जवळपास ४० हजार रूपयाचे नुकसान झाले . अगोदर संपुर्ण देशात , राज्यात , जिल्ह्यात तालुक्यात , व शहरात कोरोना चे थैमान चांगलेच पसरल्याने शासना द्वारे संचारबंदी लागु करुन लाॅकडाऊन लावण्यात आल्याने शेतकर्यांचे काम धंदे सर्व बंद पडले आहे .अश्यातच शेतकरी शंकरराव वानखेडे यांच्या शेतातल्या एका बैलाचा मृत्यु झाल्याने दुसरा बैल विकत घेतल्या शिवाय शेत काम न होता कुंटुबांच्या उदनिर्वाह चा प्रश्न उभा झाल्याने कोरोना महामारी संकट काळात म्हणजेच शेतकर्यांयावर “दुष्काळात तेरा महिना ” सारखी परिस्थिती निर्माण झाल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच उपाध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार वरुण कुमार सहारे यांच्या मार्फत मुख्यमंत्री मा.श्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवुन शेतकरी शंकरराव वानखेडे यांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतुन आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच सचिव प्रदीप बावने , कोषाध्यक्ष हरीओम प्रकाश नारायण , शेतकरी शंकरराव वानखेडे , सदस्य शाहरुख खान सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .