कन्हान परिसरात ८२८ नागरिकांचे लसीकरण
कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे ३५०, उपकेंद खंडाळा २१८ व जे एन दवाखाना २२० असे ७८८ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे ४० असे कन्हान परिसरात एकुण ८२८ लोकांना लसीकरण करण्यात आले.
कोरोना विषाणु जिवघेण्या आजारा पासुन सुरक्षित करण्याकरिता शासना व्दारे बुधवार (दि.२३) जुन २०२१ पासुन १८ वर्ष व त्यावरील वया च्या नागरिकांना मोफत लसीकरण मोहीम सुरू सुरूवात करण्यात आली असुन आज (दि.२६) जुन २०२१ ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे ३५० उपकेंद्र खंडाळा २१८ व जे एन दवाखाना कांद्री २२० असे प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ७८८ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे ४० नागरिकाना लसीकरण करण्यात आले असुन कन्हान परिसरातील एकुण ८२८ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. बुधवार (दि.२३) जुन २०२१ पासुन १८ वर्ष व त्यावरील लसीकरण सुरू झाल्याने कन्हान व साटक परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी त्वरित लसीकऱण करून घ्यावे असे आवाहान प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी व साटक च्या डॉ वैशाली हिंगे हयानी केले आहे.