कन्हान शहरात तान्हा पोळ्याला मारबतीचे दहन मिरवणूक थाटात
काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर घेऊन जा sss गे मारबत….
मानवाधिकार संरक्षण संघटना द्वारे आयोजन
कन्हान,ता.27 ऑगस्ट
शहरात मानवाधिकार संरक्षण संघटना द्वारे तान्हा पोळ्याला समाजातील वाईट पंरपरा, कुप्रथा, भष्टाचार, शेजारी देशाच्या कुरापती,आंतकवाद यांचा निषेध म्हणून काळी मारबत दहन भव्य मिरवणुक कन्हान नगरीतून संगीतमय वातावरणात धूमधडाक्यात काढण्यात आली. दरवर्षी शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा, मोठ्या पोळ्याचा दुसर्या दिवशी परंपरेतून तान्हा पोळ्याला जिल्ह्यातील लगतच्या ग्रामीण भागात ठिक-ठिकाणांहून काळ्या मारबतीची व लाकडी नंदी बैलाचा दिमाखदार व उत्साही पोळा साजरा करून मिरवणुक काढण्यात येते. यावर्षी कुठलेही निर्बंध नसल्याने मारबत शनिवार रोजी कन्हान परिसरात मानवाधिकार संरक्षण संघटना द्वारे गहुहिवरा चौक ते कन्हान नदी पर्यंत काळी मारबत दहन मिरवणूक थाटात काढण्यात आली. काळी मारबत मिरवणुक मुख्य चौकात नागपुर – जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वर आल्यानंतर नागरिकांनी पुजा अर्चना केली. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर घेऊन जा sss गे मारबत, तसेच यानिमित्ताने लहानथोर मंडळी रोगराई, संकटे, वाईट चालीरीती व प्रथा दूर करण्यासाठी इडा पिडा घेऊन ‘जा गे मारबत’….म्हणत मारबत माताला साकडं घालण्यात आले होते. मारबत मिरवणुकी मध्ये यंदा नागरिकांचा समस्यांचा प्रभाव दिसून आला . शिवाय, स्वदेशी बचाव विदेशी हटावो , प्रदूषण आणि रोगमुक्त शहरासाठी आदी विषयांवर पोस्टर तयार करण्यात आले होते. समाजातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याच्या हेतू ने तान्हा पोळ्याच्या दिवशी ही मिरवणूक काढण्यात येते असे बोलल्या जाते. या प्रसंगी मानवाधिकार संरक्षण संघटने चे पदाधिकारी राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद बांबोडे, अॅड. युवराजजी हुमणे, नगर उपाध्यक्ष योगेश रंगारी,पारशिवनी तालुका अध्यक्ष पंकज रामटेके, विलास लांडे, प्रमोद चंद्रिकापुरे, मनीष नंदेश्वर, सतीश ढबाले, अभिजीत चंदुरकर, रोशन लोंढे, सुरज बोरकुटे, प्रकाश गाते, लोकेश कोकाटे,हरिदास तिरोडे, शुभम बोरकुटे, दद्दू कोमटी, विक्की नन्हे, अमित लाडे, पंकज मंगर, लक्की तिरोडे, विक्की वानखेडे, विशाल कावळे, सोहेल उके, जितेंद्र लाळे,अमित ठाकरे, रमेश लाळे, भूषण तिरोडे, राजेंद्र नितनवरे प्रकाश नन्हे, बादल मोकरकर,अनवेश नितनवरे, अक्षय व नागरिक मोठ्या संख्येत मारबत दहन मिरवणुकीत उपस्थित होते .
Post Views: 949
Sun Aug 28 , 2022
विविध ठिकाणी बैलपोळा व तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा बळीराजाची गर्जना, झुकेगा नही, लढेगा….. कन्हान, ता.28 ऑगस्ट पारशिवनी तालुक्यातील कन्हान शहरात व ग्रामीण भागात मागील दोन वर्षे कोरोना संसर्गजन्यामुळे खंडीत झाला होता तो यावर्षी बैलपोळा व लाकडी नंदीचा दोन दिवसीय पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. […]